Home वाशिम शेलुबाजार येथुन श्री अमरनाथ यात्रे करिता पहिला जथा रवाना..

शेलुबाजार येथुन श्री अमरनाथ यात्रे करिता पहिला जथा रवाना..

69
0

आशाताई बच्छाव

Screenshot_20230709-090335_WhatsApp.jpg

शेलुबाजार येथुन श्री अमरनाथ यात्रे करिता पहिला जथा रवाना..

मंगरूळपीर/ रितेश गाडेकर
तालुक्यातील शेलुबाजार परिसरातून दरवर्षीप्रमाणे याही वर्षी जम्मू काश्मीर येथील बाबा बर्फानी च्या यात्रेला भाविक भक्त जात असतात यावर्षी पहिला जथा 35 भक्तांचा आज शुक्रवार रोजी रवाना झाला. या भक्ताचे सतीआई संस्थान येथे शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ व हार घालून स्वागत करण्यात आले. तसेच गावातून बँड बाजा वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली होती. शेलुबाजार वरून लक्झरीने अकोला व अकोला येथून हमसफर ट्रेनने 8 तारखेला मध्यरात्री पोहोचेल तसेच अजून शेलुबाजार परिसरातील दोन जथे 14 जुलै रोजी निघणार आहेत एकंदरीत शेलुबाजार परिसरातील 150 बाबा बर्फानी भक्त यात्रेकरिता दरवर्षी जात असतात यावर्षी 131 भक्त मंडळी जाणार आहे. या जथ्याला निरोप देण्याकरिता शेलुबाजार येथील श्री सतिआई भक्त मंडळी, जय बाबा बर्फानी मंडळ, श्री अमरनाथ भक्तमंडळ, शेलुबाजार ग्रामस्थ, पाटील & कंपनी, मित्रमंडळी व राजमुद्रा ग्रुपच्या माध्यमातून यांना निरोप देण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here