Home बुलढाणा ‘बुलडाणा अर्बनच्या सामाजिक उपक्रमामुळे गरजू कुटुंबियाना आधार’ अपघातात मृत्यू पावलेल्या ठेवीदारांच्या वारसांना...

‘बुलडाणा अर्बनच्या सामाजिक उपक्रमामुळे गरजू कुटुंबियाना आधार’ अपघातात मृत्यू पावलेल्या ठेवीदारांच्या वारसांना ४ लाखांच्या धनादेशाचे वितरण

85
0

आशाताई बच्छाव

IMG-20230708-WA0014.jpg

‘बुलडाणा अर्बनच्या सामाजिक उपक्रमामुळे गरजू कुटुंबियाना आधार’ अपघातात मृत्यू पावलेल्या ठेवीदारांच्या वारसांना ४ लाखांच्या धनादेशाचे वितरण
लोहा/प्रतिनिधी
बुलडाणा अर्बनच्या सामाजिक उपक्रमामुळे गरजू कुटुंबियाना आधार’ मिळत असून लोहा शाखेतील ठेवीदारांचा अपघातात मृत्यू पावलेल्या ठेवीदारांच्या वारसांना ४ लाखांच्या धनादेशाचे वितरण करण्यात आले.
सहकाराची समृद्ध परंपरा जतन करत सहकाराला सामाजिक उपक्रमांतर्गत बुलडाणा अर्बन परिवाराचे संस्थापक अध्यक्ष मा.(भाईजी) राधेश्यामजी चांडक व चीफ मॅनिजिंग डायरेक्टर डॉ.सुकेशजी झंवर साहेब यांच्या कार्यतत्परतेमुळे कित्येक गरजू कुटुंबियाना आधार मिळत असल्याचे प्रतिपादन विभागीय व्यवस्थापक प्रफुल्ल संचेती यांनी केले.
लोहा शहरातील बुलडाणा अर्बनच्या शाखेत मयत ठेवीदार वारसदार शिवराज सोनवळे यांना विमा संरक्षण रक्कम ४ लक्ष रुपये वाटप कार्यक्रम संपन्न झाला .यावेळी विभागीय व्यवस्थापक प्रफुल्ल संचेती म्हणाले की, बुलडाणा अर्बन नेहमीच ग्राहक, लघुउद्योजक व शेतकरी सभासदांच्या हितासाठी आर्थिक व सोशल बँकिंग राबवणारी आशिया खंडात सहकार क्षेत्रात वेगळी ओळख निर्माण करणारी अग्रगण्य संस्था म्हणून ओळख निर्माण करणारी अग्रगण्य संस्था म्हणून ओळखली जात असल्याचे गौरवोद्गार काढले.तसेच बुलडाणा अर्बन नेहमीच विविध सामाजिक उपक्रम राबवत पर्यावरण संतुलन राखण्यासाठी वृक्षलागवड,गरजूंना धान्य वाटप,उच्च शिक्षणासाठी मदत,अपंग व्यक्तींना सहाय्य, बेवारस प्रेतांना त्यांच्या धर्माप्रमाणे अंत्यसंस्कार, रुग्णांना वेळेवर दवाखान्यात पोहचण्यासाठी अंबुलन्स सुविधा, अत्यल्प दरात कर्ज वाटप करून लोकांना सावकारी पाशातून मुक्त केले.कारागृहातील बंदी बांधवांना सुधारण्यासाठी संधी देण्याचे कार्य, वेअर हाऊस निर्मिती मुळे शेतकऱ्यांचे धान्य सुरक्षित ठेवण्यास मदत असे विविध उपक्रम बुलडाणा अर्बन च्या माध्यमातून देशभरात राबवले जात असल्याची अनेकांनी वेळोवेळी दखल घेऊन प्रशंसनीय उपक्रम राबवत असल्याबाबत अनेकांनी मत व्यक्त केले.
बुलडाणा अर्बन लोहा शाखेत बस्वराज शिवराज सोनवळे यांचे मुदत ठेव रक्कम रु.४ लक्ष होते. परंतु त्यांचा टिप्पर अपघातात दि.०४ मे २०२२ रोजी दुर्दैवी मृत्यू झाला. संस्थेच्या वतीने सभासदांच्या ठेवीला विमा संरक्षण देण्यात आले.सदर घटनेची माहिती मिळताच विभागीय व्यवस्थापक प्रफुल्ल संचेती यांच्या मार्गदर्शनानुसार शाखा व्यवस्थापक रमेश गव्हाणे व केशवराव शेटे यांनी परिवाराचे सांत्वन करून सदर अपघात विमा संदर्भात माहिती दिली व कागदपत्रांची पूर्तता करून प्रस्ताव मुख्यालयास सादर करण्यात आला व तो मंजुरही झाला.
यावेळी बुलडाणा अर्बन शाखा व्यवस्थापक रमेश गव्हाणे,शाखा व्यवस्थापक केशवराव शेटे,राजु जैन,ओमप्रकाश सोनवळे, प्रवीण कदम,ऋषिकेश खरात, दत्ता दागटे, चंद्रकांत मुंडकर व सदाशिव गायकवाड, आदि उपस्थित होते.

Previous articleराज्यात चरित्रहीन राजकारण सुरू, सत्तेसाठी विकावृत्तीचे माणसं बाजारपेठेत.खा. अरविंद सावंत.
Next articleशेलुबाजार येथुन श्री अमरनाथ यात्रे करिता पहिला जथा रवाना..
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here