Home मुंबई रेल्वे प्रशासनाकडून प्रवाशांना खुशखबर ! उद्या पासून दोन डोस झालेल्या नागरिकांना लोकल...

रेल्वे प्रशासनाकडून प्रवाशांना खुशखबर ! उद्या पासून दोन डोस झालेल्या नागरिकांना लोकल तिकट मिळणार…!

167
0

राजेंद्र पाटील राऊत

रेल्वे प्रशासनाकडून प्रवाशांना खुशखबर ! उद्या पासून दोन डोस झालेल्या नागरिकांना लोकल तिकट मिळणार…!

ठाणे (अंकुश पवार,सहसंपादक ठाणे/युवा मराठा वेब न्युज चॅनल)

गेल्या वर्षभरापासून जगात हाहाकार माजविला आलेल्या करोना महामारी ने राज्यातील जनतेला सर्वच बाजूने अडचणीत आणलेले आहे. त्यात आर्थिक नुकसान अनेक लोकांचे झाले आहे.

अनेक लोकांचे कामधंदे गेले होते , राज्याची अर्थव्यवस्था देखील बिघडलेली दिसून येते. आता कुठे वर्षभराने सर्व सुरळीत सुरू होतं आहे. तोच रेल्वे प्रशासनाकडून प्रवाशांची लूट केली जाते आहे. अशा विषयाची बातमी युवा मराठा वेब न्युज चॅनल ने प्रसारित केली होती. त्यानंतर ३ तासाच्या आत रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले की,दोन डोस झालेल्या नागरिकांना लोकल ट्रेन तिकीट उद्या पासून मिळणार आहे.
याआधी रेल्वे स्थानकात प्रवाशांना सरकारी ओळखपत्र,हॉस्पिटल, फार्मसिस्ट कंपनीच्या ओळखपत्र यांवर लोकल ट्रेन चे तिकीट दिले जात नव्हते, तसेच दोन डोस झालेल्या नागरिकांना युनिव्हर्सल पास असून देखील लोकल तिकीट न देता संपूर्ण महिन्याचा पास दिला जात होता.

दिवाळीचा सण आहे,लोक लोकल ट्रेन ने खरेदीसाठी भुलेश्वर,csmt,मुंबई ला खरेदीला जातात असे असताना रेल्वे प्रशासनाकडून लोकल तिकीट न देता संपूर्ण महिन्याचा पास दिला जातो होता , या प्रकरणावरून आम्ही प्रसारित केलेल्या बातमी च इम्पॅक्ट रेल्वे प्रशसनावर झालेला दिसून येतो.
अश्या प्रकारे एस टी कामगारांच्या,वीज ग्राहकांच्या बाबतीत अनेक प्रश्न युवा मराठा न्युज चॅनलवर मांडलेले आहेत आणि नागरिकांना न्याय मिळाला आहे.

Previous articleशाळा तिथे शिक्षक परिषद -आमदार श्री नागो गाणार सर
Next articleकै.रामचंद्र पाटील माध्यमिक विद्यालय (शेळगाव गौरी ) येथे निरोप समारंभ कार्यक्रम संपन्न.
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here