Home भंडारा आनंदधाम गिरोला येथे डॉ.अक्षय कहालकर यांचा सत्कार…..

आनंदधाम गिरोला येथे डॉ.अक्षय कहालकर यांचा सत्कार…..

69
0

आशाताई बच्छाव

IMG_20231205_073819.jpg

आनंदधाम गिरोला येथे डॉ.अक्षय कहालकर यांचा सत्कार…..
कहालकर दुःखनिवारक दवाखाना भंडारा व सत्य साई संस्थान मार्फत मोफत वैद्यकीय आरोग्य शिबिर…..
जवळपास 150 रूग्णांनी घेतला लाभ….

संजीव भांबोरे
भंडारा( जिल्हा प्रतिनिधी) साकोली जवळच्या गिरोला(किटाळी) येथे सिद्ध साक्षी आनंदधाम तर्फे दरवर्षी प्रमाणे ह्यावर्षी सुद्धा वार्षिक कार्यक्रम व गादीपदग्रहण सोहळा तसेच जिल्हास्तरीय सत्कार कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यात “कहालकर दुःखनिवारक दवाखाना भंडारा” चे डॉ.अक्षय कहालकर यांचा शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आले व मोफत वैद्यकीय आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आला.

कहालकर दुःखनिवारक दवाखाना मार्फत रूग्णसेवा व समाजसेवा केली जाते. विविध सामाजिक कार्यात सदैव अग्रेसर म्हणून ओळख आहे. बऱ्याच ठिकाणी मोफत वैद्यकीय आरोग्य शिबिर आयोजित करण्यात येतात. डॉ.अक्षय कहालकर यांच्या “सामाजिक बांधिलकी” व रूग्णसेवेची दखल घेवून सत्कार करण्यात आला.

कहालकर दुःखनिवारक दवाखाना भंडारा व सत्य साई संस्थान मार्फत मोफत वैद्यकीय आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आला होता, त्यात जवळपास 150 रूग्णांची मोफत तपासणी करून औषधोपचार करण्यात आला. त्यात शरीराचे दुखणे, मणक्याचे समस्या ह्यावर भर देण्यात आला.

कार्यक्रमाचे आयोजक डमदेवजी कहालकर सर व संपूर्ण कहालकर परिवार तसेच माजी आमदार डॉ. कापगते, जेवनाळा, किटाळी ,दिघोरी/मोठी, नरव्हा येथील भजनी मंडळ व बाहेरील जिल्ह्यातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous articleसंगणक परिचालकाचा आमदाराचे कार्यालयासमोर धरणे आंदोलन.
Next articleयेणाऱ्या निवडणुकांमध्ये जनविरोधी लोकांना पाडण्यासाठी कामाला लागा
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here