Home Breaking News जाती-धर्माच्या भिंती “कोरोनाने” तोडल्या…!मरीनलाईन्स कब्रस्थानात हिंदू बांधवांनवर अंत्यसंस्कार 🛑 ✍️ मुंबई :(...

जाती-धर्माच्या भिंती “कोरोनाने” तोडल्या…!मरीनलाईन्स कब्रस्थानात हिंदू बांधवांनवर अंत्यसंस्कार 🛑 ✍️ मुंबई :( विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

125
0

🛑 जाती-धर्माच्या भिंती “कोरोनाने” तोडल्या…!मरीनलाईन्स कब्रस्थानात हिंदू बांधवांनवर अंत्यसंस्कार 🛑
✍️ मुंबई 🙁 विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

मुंबई :⭕ मुंबईत कोरोना अजूनही नियंत्रणात येत नाही. कोरोनाचा प्रादुर्भाव संपूर्ण मुंबईत गरिब आणि श्रीमंतांमध्येही वाढतोय. मुंबईत आतापर्यंत 4631 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. मुंबईतील सर्व स्मशानभूमीमध्ये रोज प्रेतांचा खच पडत आहे. एका प्रेतावर अंत्यसंस्कारासाठी दीड ते दोन तासांचा अवधी लागत असल्याने स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कारासाठी प्रतिक्षा करावी लागत आहे. त्यावर उपाययोजना म्हणून पालिकेकडून अंत्यसंस्कारासाठी ऑनलाईन नोंदणीची व्यवस्था केली.

तसेच कोरोना झाल्यावर संबंधिताला अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
नातेवाईक, शेजाऱ्यांनी तर कोरोनाबाधीत कुटुंबाना वाळीत टाकल्याचे प्रकरणही समोर आले होते. अशावेळी मरीनलाईन्स येथील बडा कब्रस्थान हिंदू आणि मुस्लिम समाजातील लोकांसाठी दिलासा देणारे ठरले आहे. या कब्रस्थानमध्ये गेल्या एप्रिलपासून मुस्लिमांच्या मृतदेहाचे दफन होत आहेच; मात्र येथे हिंदूं बांधवांच्या कोरोनाच्या सुमारे 200 मृतदेहाचे अंत्यसंस्कार करण्यात आल्याची माहिती बडा कब्रस्थानचे सदस्य इकबाल ममदानी यांनी दिली. त्यामुळे या कब्रस्थानात कोरोनाने जाती धर्माच्या भिंतींना मूठमाती दिल्याचे दिसून आले.

जात आणि धर्माच्या भीती गेल्या काही वर्षांत बळकट झाल्या होत्या. त्यात हिंदू – मुस्लिम यांच्यातील द्वेषाचे राजकारण केले गेले. कोरोनाच्या महारोगाने जातीच्या भीती पुसल्या जात आहेत. बडा कब्रस्थानमध्ये तर जाती धर्माच्या भीतीच उध्वस्त झाल्या आहेत. या कब्रस्थानत दिसते ती फक्त मानवता. या कब्रस्थानातील कमिटीच्या सदस्यांनी शहर आणि उपनगरासाठी तीन गट तयार केले आहेत. ते गट अडचणीत असलेल्या हिंदू-मुस्लिम बांधवांच्या मृतदेहांवर त्यांच्या धार्मिक रितिरिवाजानुसार आणि मृतदेहाचे पावित्र्य राखून अंत्यसंस्कार केले जात असल्याची माहिती ममदानी यांनी दिली….⭕

Previous articleरत्नागिरी मधे छावा प्रतिष्ठान तर्फे १७ जुलैला ! रक्त दान शिबिरांचे आयोजन..! 🛑 ✍️ रत्नागिरी:( विजय वसंत पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )
Next article
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here