🛑 रत्नागिरी मधे छावा प्रतिष्ठान तर्फे १७ जुलैला ! रक्त दान शिबिरांचे आयोजन..! 🛑
✍️ रत्नागिरी:( विजय वसंत पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )
रत्नागिरी :⭕कोरोना संसर्ग वाढण्याची भीती असताना त्याचा मुकाबला करण्यासाठी जिल्ह्याची आरोग्य यंत्रणा युद्धपातळी वर काम करत आहे.अशावेळी त्यांना सामाजिक भावनेतून सहकार्य करण्यासाठी छावा प्रतिष्ठान रत्नागिरी तर्फे ‘रक्तदान शिबिराचे’ आयोजन करण्यात आले आहे.
छावा प्रतिष्ठान रत्नागिचे अध्यक्ष सुनील अनंत धावडे आणि उपाध्यक्ष सुनिल आग्रे यांच्या संकल्पनेतून छावा प्रतिष्ठान स्थापन झाले.
असून समाजातील गरजूं लोकांना मदत करण्याचे काम प्रतिष्ठान करते. याच भावनेतून प्रतिष्ठान चे विद्यमान सदस्य सुदीप पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आगामी काळात जिल्हा शासकीय रुग्णालयात रक्ताची निर्माण होणारी गरज लक्षात घेऊन छावा प्रतिष्ठान ने या रक्तदान शिबिराचे आयोजन केले असून या काळात कोरोनामुळे लागू असलेल्या निर्बंधाचेही पालन केले जाणार आहे.
१७ जुलै २०२० रोजी सकाळी १० ते ०१ या वेळेत बोंडये-नारसिंगे ग्रुप ग्रामपंचायत बहुउद्धेशिय सभागृह येथे हे रक्तदान शिबिर होणार आहे. त्यामुळे इच्छुकांनी आपली नावे ९१३००८५६४१, ९२०३२३३१९८ या नंबर वर कळवावी असे आवाहन छावा प्रतिष्ठान रत्नागिरीकडून करण्यात येत आहे….⭕
