Home गडचिरोली येणाऱ्या निवडणुकांमध्ये जनविरोधी लोकांना पाडण्यासाठी कामाला लागा

येणाऱ्या निवडणुकांमध्ये जनविरोधी लोकांना पाडण्यासाठी कामाला लागा

50
0

आशाताई बच्छाव

IMG_20231205_074247.jpg

 

येणाऱ्या निवडणुकांमध्ये जनविरोधी लोकांना पाडण्यासाठी कामाला लागा

भाई रामदास जराते यांचे कार्यकर्त्यांना आवाहन

गडचिरोली,(सुरज गुंडमवार )-:- बेकायदेशीर लोहखाणी, बळजबरी भूसंपादन, रस्ते अपघात, पीक नुकसान, आरक्षण, शिक्षण, नोकरी, नोकरदार अशा विविध प्रश्नांवर जनविरोधी भूमिका घेवून दलाली काम करणाऱ्यांना येणाऱ्या निवडणुकांमध्ये पाडण्यासाठी शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आजपासून कामाला लागावे, असे आवाहन शेतकरी कामगार पक्षाचे नेते भाई रामदास जराते यांनी केले.

शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने स्थानिक पत्रकार भवनात आयोजित करण्यात आलेल्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत मार्गदर्शन करताना ते बोलत होते. भाई रामदास जराते पुढे म्हणाले की, जिल्ह्यात शेतकरी कामगार पक्षाने आपली स्वतःची फळी निर्माण केली असून प्रागतिक पक्ष, महाराष्ट्र आघाडीतील घटक पक्षांना सोबत घेवून येणाऱ्या निवडणुका लढण्यात येणार आहेत. ज्या ठिकाणी आपण जिंकून येवू शकत नाही, त्या ठिकाणी जनविरोधी कामे करणाऱ्यांना हरवू शकू एवढी ताकद प्रागतिक पक्षांची असल्याने कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागावे. असा सल्लाही त्यांनी यावेळी कार्यकर्त्यांना दिला.

या बैठकीला पक्षाचे जिल्हा खजिनदार भाई शामसुंदर उराडे, जयश्री जराते, युवक आघाडीचे जिल्हाध्यक्ष भाई अक्षय कोसनकर, जिल्हा समितीचे सदस्य क्रीष्णा नैताम, गंगाधर बोमनवार, तुळशीदास भैसारे, पांडुरंग गव्हारे, बाजीराव आत्राम यांचेसह मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सचिव काॅ. अमोल मारकवार, बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पक्षाचे जिल्हा प्रभारी राज बन्सोड यांनी प्रामुख्याने उपस्थित राहून मार्गदर्शन केले.

पक्षसंघटना बांधणी आणि ९ डिसेंबर रोजी होणाऱ्या उलगुलान महामोर्चाला मोठ्या संख्येने शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने लोकांनी सहभागी होण्यासाठीही यावेळी नियोजन करण्यात आले.

तुकाराम गेडाम, अशोक किरंगे, चंद्रकांत भोयर, डॉ. भाऊराव चौधरी, पवित्र दास, देविदास संघर्तीवार, देवराव शेंडे, मारोती आगरे, चिरंजीव पेंदाम, देवानंद साखरे, विलास अडेंगवार, देविदास मडावी, रामदास आलाम, अनिल आगरे, तितिक्षा डोईजड, निशा आयतूलवार,जया मंकटवार, कविता ठाकरे, निर्मला सुरपाम, विजया मेश्राम, सुनिता पदा, छाया भोयर,गिता प्रधान, कुसूम नैताम, हिराचंद कोटगले, रेवनाथ मेश्राम, प्रकाश पाल, शरद कोसमशिले, बाळकृष्ण मेश्राम, रामदास दाणे, माणिक गावळे, विजय गावतुरे, ओमप्रकाश चौधरी, राजकुमार प्रधान, महेंद्र जराते यांचेसह शेकडो कार्यकर्ते या बैठकीला उपस्थित होते.

Previous articleआनंदधाम गिरोला येथे डॉ.अक्षय कहालकर यांचा सत्कार…..
Next articleकमको बँकेचे नवनिर्वाचित चेअरमन गजानन (अण्णा) सोनजे यांचा “युवा मराठा न्यूज” कडून सत्कार!
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here