Home गडचिरोली व्याहाड खुर्द येथे माजी मंत्री विजय वडेट्टीवार यांचेकडून कॅन्सर ग्रस्त नागरिकाला आर्थिक...

व्याहाड खुर्द येथे माजी मंत्री विजय वडेट्टीवार यांचेकडून कॅन्सर ग्रस्त नागरिकाला आर्थिक मदत

49
0

आशाताई बच्छाव

IMG-20221108-WA0025.jpg

व्याहाड खुर्द येथे माजी मंत्री विजय वडेट्टीवार यांचेकडून कॅन्सर ग्रस्त नागरिकाला आर्थिक मदत

सावली/गडचिरोली, (सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क )
राज्याचे माजी मंत्री विजय भाऊ वडेट्टीवार यांचे कडून व्याहाड खुर्द येथील कॅन्सर ग्रस्त नागरिक नामे अशोक दामोधर लोणारे यांना पुढील उपचारासाठी आर्थिक मदत देण्यात आली
राज्याचे माजी मंत्री विजय भाऊ वडेट्टीवर साहेब हे नुकतेच सावली तालुका दौऱ्यावर आले असता व्याहाड खुर्द येथील काँग्रेस चे कार्यकर्ते निखिल सुरमवार, राजू टोंगे, केशव पाटील भरडकर माजी सरपंच, यांनी श्री लोणारे यांच्या तब्येतीची माहिती दिली होती त्तकाल माननीय विजय भाऊ वडेट्टीवार यांनी सदर बाब माहित होताच आर्थिक मदत पाठीवली
माननीय विजय भाऊ वडेट्टीवार यांनी आजपर्यंत अनेक रुग्णांना मदत केलेली आहे त्याचीच प्रचिती आज पुन्हा बघायला मिळाली जनसेवा ही खरी ईश्वर सेवा असते
सदर आर्थिक मदत व्याहाड खुर्द चे माजी सरपंच केशव पाटील भरडकर यांचे हस्ते देण्यात आली यावेळी राजू पाटील टोंगे ग्रामपंचायत सदस्य, अनिल पाटील मशाखेतरी, सावली तालुका काँग्रेस अध्यक्ष नितीन गोहणे उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here