Home भंडारा आलेबेदर येथे पाच दिवसीय विद्यार्थी उन्हाळी शिबिराचे समारोपीय कार्यक्रम

आलेबेदर येथे पाच दिवसीय विद्यार्थी उन्हाळी शिबिराचे समारोपीय कार्यक्रम

46
0

आशाताई बच्छाव

1000347905.jpg

आलेबेदर येथे पाच दिवसीय विद्यार्थी उन्हाळी शिबिराचे समारोपीय कार्यक्रम

राष्ट्रीय ट्रेनिंग चीप संघप्रिय नाग यांची उपस्थिती

 

संजीव भांबोरे
भंडारा( जिल्हा प्रतिनिधी)त्रिरत्न बुद्ध विहार आलबेदर येथे समता सैनिक दलातर्फे विद्यार्थ्यांच्या उन्हाळी पाच दिवसीय शिबिर समारोपीय कार्यक्रम घेण्यात आले. याप्रसंगी राष्ट्रीय ट्रेनिंग चीप संघप्रिय नाग हे अध्यक्षस्थानी होते. तर प्रमुख अतिथी म्हणून राकेश बोरकर, समता सैनिक दलाचे जिल्हा आर सी फूलुके, पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते डी जी रंगारी, संतोष उटनकर, राकेश बोरकर, तनुजा नागदेवे, योगराज भोयर, मोना मेश्राम, रोशन फुले व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला. राष्ट्रीय ट्रेनिंगची संघप्रिय नाग व सामाजिक कार्यकर्ते डी जी रंगारी यांनी आपल्या भाषणात सांगितले की ,विद्यार्थी दशेमधूनच बालवयातून चांगले विचार रुजवले जाऊ शकतात .पाच दिवसांमध्ये जे काही ट्रेनिंग आपल्या आपण घेतली त्या ट्रेनिंगच्या उपयोग आपल्या समोरच्या जीवनात कसं उपयोगात आणता येईल व भगवान गौतम बुद्ध व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचार मनात कसा रुजवता येईल या दृष्टिकोनातून प्रयत्न करावे असे व्यक्त करण्यात आले.
पाच दिवसीय प्रशिक्षण शिबिरामध्ये विविध सांस्कृतिक कार्यक्रम ,अंधश्रद्धा निर्मूलन, आरोग्य कवायत ,जुडू कराटे ,सांस्कृतिक कार्यक्रम असे विविध उपक्रम राबविण्यात आले.
तसेच विद्यार्थ्यांच्या पाच दिवसीय उन्हाळी ट्रेनिंग शिबिरामध्ये यांनी स्वतः कडून भोजनदान दिले . यावेळी सामाजिक कार्यकर्ते डी जी रंगारी , उमेश मेश्राम , तनुजा नागदेवे, यांचं पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
पालकांच्या आणि विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया शिबिरा विषयी प्रतिक्रिया दिले त्यांनी अशा पद्धतीची शिबिर वेळोवेळी घेतले गेले पाहिजे असे पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी व्यक्त केले.
समारोपी कार्यक्रमाचे संचालन भंते महामोगलायन यांनी केले.
कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता मोना मेश्राम ,स्वप्निल गणवीर , जितेंद्र बडोले ,आर्यन राऊत, प्रजय कराडे ,साहिल मेश्राम, ईशांत खांडेकर ,अमित नागदेवे ,उमेश मेश्राम,व इतर सर्व कार्यकर्त्यांनी खूप मेहनत घेतली व कार्यक्रम यशस्वी केले केले.

Previous articleमहाशिवपुराण कथा; कलश यात्री दरम्यान महिला दगावली. अटी शर्तीचा भंग आयोजकाविरुद्ध गुन्हे दाखल.
Next articleआलेबेदर येथे पाच दिवसीय विद्यार्थी उन्हाळी शिबिराचे समारोपीय कार्यक्रम
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here