Home भंडारा संगणक परिचालकाचा आमदाराचे कार्यालयासमोर धरणे आंदोलन.

संगणक परिचालकाचा आमदाराचे कार्यालयासमोर धरणे आंदोलन.

99
0

आशाताई बच्छाव

IMG_20231205_073445.jpg

संगणक परिचालकाचा आमदाराचे कार्यालयासमोर धरणे आंदोलन.
मानधन वाढ व इतर मागण्यांचे आमदाराना दिले निवेदन

संजीव भांबोरे
भंडारा( जिल्हा प्रतिनिधी) आपले सरकार सेवा केंद्र प्रकल्पाअंतर्गत ग्रामपंचायतला कार्यरत संगणक परीचालकाना यावलकर समितीच्या शिफारशीनुसार आकृतीबंधात समाविष्ट करून कर्मचारी दर्जा व किमान वेतन देण्याच्या मागणीसाठी मागील 12 वर्षापासून संगणक परीचालकाचे नागपुर, मुंबई येथे अनेक आदोलन झाले. मात्र अजुनही निर्णय लागलेला नसल्या कारनाने महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत संगणक परिचालक कर्मचारी संघटनेकडून राज्यभरात 08 नोव्हेंबर 2023 पासून बेमुदत कामबंद आदोलन सुरू आहे. सोबतच सरकार, प्रशासनावर दबाव यावा यासाठी म्हणून 20 नोव्हेंबर 2023 ला पंचायत समिती कार्यालयासमोर, 28 नोव्हेंबर ला जिल्हा परिषद कार्यालयासमोर एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. मात्र त्या आदोलनाचीही दखल घेण्यात आलेली नाही त्याकारनाने आज विधानसभा सदस्याचे कार्यालयासमोर एकदिवसीय लाक्षणिक धरणे आंदोलन करण्यात आले.
भंडारा जिल्हातही भंडारा, साकोली, तुमसर विधानसभा क्षेत्रात आमदार साहेबाचे निवासस्थानासमोर एकदिवसीय लाक्षणिक धरणे आंदोलन करण्यात आले. तुमसर येथील मा.आमदार राजु कारेमोरे यानी त्याचे कार्यालयासमोर सुरू असलेल्या संगणक परिचालकाचे आदोलनास भेट देऊन मागण्यांबाबत सविस्तर चर्चा केली आणि येत्या हिवाळी अधिवेशनात आपल्या मागण्यांबाबत प्रश्न उपस्थित करून तो सोडविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले. तसेच जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी याचेशी फोनवर चर्चा करून जिल्हा स्तरावरील प्रश्न तात्काळ सोडविण्यात याव्या अशी सुचना केली.

महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत संगणक परिचालक संघटनेचे भंडारा जिल्हाध्यक्ष दिगांबर कुंडलिक वंजारी याचे नेतृत्वात जिल्ह्यातील विधानसभा सदस्याचे कार्यालयासमोर सुरू असलेल्या तुमसर येथील आदोलनाचे यशस्वीतेसाठी तुमसर तालुकाध्यक्ष खेमेद्र राणे, महीला जिल्हाध्यक्षा सुशीला, गिरीजा रहांगडाले, तुरकर व तालुक्यातील सर्व संगणक परीचालकानी सहकार्य केले.

आम्ही केलेल्या विविध आदोलनाची सरकारने दखल घेतली नसल्याकारनाने संगणकपरीचालकाचा हिवाळी अधिवेशनावर विराट मोर्चा नियोजित असून मागण्या मान्य होईपर्यंत माघार घेणार नाहीत असे ठरवले आहे.

दिगांबर कुंडलिक वंजारी
जिल्हाध्यक्ष म.रा.ग्रा.सं.प.क.संघटना भंडारा

Previous articleमहाराष्ट्र राज्य आट्यापाट्या संघाला यश
Next articleआनंदधाम गिरोला येथे डॉ.अक्षय कहालकर यांचा सत्कार…..
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here