• Home
  • कशेडी घाटात(रत्नागिरी ) खासगी बसचा मोठा अपघात

कशेडी घाटात(रत्नागिरी ) खासगी बसचा मोठा अपघात

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20201231-WA0026.jpg

कशेडी घाटात(रत्नागिरी ) खासगी बसचा मोठा अपघात

रत्नागिरी : कशेडी घाटात तब्बल ५० फुट दरीत एक बस कोसळली आज सकाळी पहाटे चार वाजताच्या सुमारास हा अपघात झाला. या अपघातात एका ७ वर्षांच्या चिमुकल्याचा मृत्यू झाला आहे. तर बसमधील २५ जणांना बाहेर काढण्यात यश आलं आहे.
मदत कार्य जोरात सुरु आहे
मुंबईच्या सायन येथून कणकवलीकडे जाणारी चिंतामणी नावाची खासगी आराम बस पहाटे चार वाजता कशेडी घटातील ५० फुट दरीत कोसळली. या बसमध्ये २७ प्रवासी होते. त्यापैकी २५ जणांना बाहेर काढण्यात आले आहेत.
या प्रकरणी मदत कार्य जलदगतीने सुरु आहे. या बसमधील बहुतेक प्रवासी हे संगमेश्वर येथील रहिवाशी आहेत. या अपघातात सात वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. तर एक वृद्ध अजून गाडीत अडकून आहे.
जगदगुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थानांची रुग्णवाहिका तसेच महाराष्ट्र शासनाच्या १०८ रुग्णवाहिका घटनास्थळी मदतीला पोहोचल्या आहेत. मदत कार्यात वाचवण्यात आलेल्या २५ जखमी प्रवाशांना पोलादपूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत

युवा मराठा न्यूज नेटवर्क .

anews Banner

Leave A Comment