Home नांदेड ओला दुष्काळ जाहीर करा–संभाजी ब्रिगेड हेक्टरी पन्नास हजार रुपये नुकसानभरपाई द्या अन्यथा...

ओला दुष्काळ जाहीर करा–संभाजी ब्रिगेड हेक्टरी पन्नास हजार रुपये नुकसानभरपाई द्या अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा.

47
0

आशाताई बच्छाव

IMG-20220714-WA0020.jpg

ओला दुष्काळ जाहीर करा–संभाजी ब्रिगेड
हेक्टरी पन्नास हजार रुपये नुकसानभरपाई द्या अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा.
नांदेड जिल्हा ब्युरो चीफ मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
देगलूर- मागील आठवडाभरापासून नांदेड जिल्ह्यात संततधार पाऊस सुरू आहे, यावर्षी वेळेवर पावसामुळे शेतकऱ्यांच्या पेरण्या वेळेवर झाल्या होत्या पण अचानक गेल्या पाच दिवसापासून सूर्यदर्शनही झाले नाही,सततच्या पावसामुळे पूर परिस्थिती निर्माण झाली आहे, संततधार पावसामुळे काही भागातील पिके नष्ट झाली आहेत
काही नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत त्यामुळे
शेतकऱ्यावर दुबार पेरणीचे संकट निर्माण झाले आहे
शेतकऱ्यावर कोसळलेल्या नैसर्गिक संकटामुळे मोठे
आर्थिक नुकसान होऊन आर्थिक संकटाचा सामना
करावा लागत आहे,अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या
पिकाचे पंचनामे प्रशासनाला करायला लावावेत व
शेतकऱ्यांना तात्काळ पन्नास हजार रुपये आर्थिक मदत देऊन दिलासा द्यावा अन्यथा संभाजी ब्रिगेड च्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल.असे निवेदन संभाजी ब्रिगेड च्या संभाजी ब्रिगेड लोकसभा अध्यक्ष संकेत पाटील, तालुकाध्यक्ष जेजेराव पाटील शिंदे करडखेडवाडीकर,शहराध्यक्ष
अनिल पाटील मलकापूरकर .ता.सचिव देविदास पाटील थडके यांच्या वतीने देगलुर तहसिलदार साहेब यांना निवेदन देण्यात आले.

Previous articleमेशीचे आरोग्य केंद्रच पडले आजारी;रुग्णांऐवजी केंद्रावरच उपचाराची मागणी
Next articleवडगाव चे माजी आमदार नानासाहेब माने यांचे निधन .
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here