Home Breaking News 🛑 Realme M1 Sonic इलेक्ट्रिक टूथब्रश भारतात लाँच, १० सप्टेंबरला सेल 🛑

🛑 Realme M1 Sonic इलेक्ट्रिक टूथब्रश भारतात लाँच, १० सप्टेंबरला सेल 🛑

131
0

🛑 Realme M1 Sonic इलेक्ट्रिक टूथब्रश भारतात लाँच, १० सप्टेंबरला सेल 🛑

✍️ मुंबई ( साईप्रजित मोरे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज ).

मुंबई, 5 सप्टेंबर : ⭕ रियलमीने भारतात आपला इलेक्ट्रिक टूथब्रश Realme M1 Sonic ला भारतात लाँच केले आहे. १९९९ रुपये किंमत असेल्लया या इलेक्ट्रिक टूथब्रशमध्ये ९० दिवसांपर्यंत बॅटरी लाईफ आहे. याचा सेल १० सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजता सुरू होणार आहे. ब्लू आणि व्हाइट कलर ऑप्शनमध्ये लाँच करण्यात आलेल्या या रियलमी एम१ सोनिक टूथब्रशला फ्लिपकार्ट आणि रियलमीची अधिकृत वेबसाईट वरून खरेदी करता येवू शकते.

➡️ रियलमी M1 सोनिक इलेक्ट्रिक टूथब्रशचे फीचर :-

रियलमीचा हा टूथब्रश हाय फ्रीक्वेंसी सोनिक मोटर, अँटिबॅक्टिरियल ब्रिसल्स सोबत येते. ९० दिवसांची बॅटरी लाइफची इलेक्ट्रिक टूथब्रश एक मिनिटात ३४ हजार वेळा व्हायब्रेट करते. दातांची स्वच्छता चांगली व्हावी यासाठी हे इतक्या वेळेस व्हायब्रेट होते. या टूथब्रशची कॉम्पॅक्ट डिझाइन आहे. युज करताना यात 60dB पेक्षाही कमी आवाज येतो.

टूथब्रशमध्ये चार क्लिनिंग मोड्स देण्यात आले आहेत. यात सेंसिटिव्ह दातांसाठी सॉफ्ट, डेली युजसाठी क्लिन, डीप क्लिनिंगसाठी व्हाईट आणि चमकदार दातांसाठी पॉलिश मोड उपलब्ध आहेत. या टूथब्रशमध्ये कर्व्ड बॉडी आणि फ्रिक्शन कोटिंग दिली आहे. हातात पकडण्यासाठी खूप कंफर्टेंबल नॉन स्लिपरी बनवते. टूथब्रशमध्ये देण्यात आलेले ब्रिसल्स ब्लू इंडिकेटर सोबत येते.

ब्लू इंडिकेटरच्या या ब्रिसल साठी कलर फेड झाल्यानंतर युजर याच्या ब्रशला हेड बदलू शकतात. रियलमीने आपल्या इलेक्ट्रिक टूथब्रशला मेटल फ्री ठेवले आहे. कारण, कोणत्याही प्रकारची ओरल दुखापत होऊ नये. वायरलेस चार्जिंग सपोर्ट सोबत इलेक्ट्रिक टूथब्रश मध्ये 800mAh ची बॅटरी दिली आहे. याला चार्जिंगसाठी ४.५ तास लागतात. ५ मिनिटात चार्जिंग करून हे टूथब्रश दोन दिवस वापरता येते असे कंपनीचे म्हणणे आहे.⭕

Previous article🛑 Yulu E-Bike ची राईड घ्यायचीय ? जाणून घेऊयात प्रकल्प 🛑
Next article🛑 विद्यापीठ परीक्षा कशा होणार? वाचा सर्व ११ शिफारशी 🛑
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here