Home नाशिक मेशीचे आरोग्य केंद्रच पडले आजारी;रुग्णांऐवजी केंद्रावरच उपचाराची मागणी

मेशीचे आरोग्य केंद्रच पडले आजारी;रुग्णांऐवजी केंद्रावरच उपचाराची मागणी

56
0

आशाताई बच्छाव

IMG-20220714-WA0022.jpg

(भिला आहेर युवा मराठा न्युज नेटवर्क)
देवळा प्रतिनिधी:- मेशी प्राथमिक आरोग्य केंद्राला घेरले अनेक समस्यांनी . संपूर्ण इमारतच धोकादायक, इमारतीला उतरला विद्युत प्रवाह .
तात्काळ व चांगल्या प्रकारे सेवा देणारे असे एकेकाळी नाशिक जिल्ह्यात नावारूपाला आलेले प्राथमिक आरोग्य केंद्र अनेक समस्यांनी ग्रासले असून आरोग्य केंद्राची संपूर्ण इमारतच धोकादायक झाली असून इमारतीच्या आतल्या बाजूचे छत ठिकठिकाणी कोसळले असून बऱ्याच ठिकाणी छत लिक असून जवळपास सगळ्याच खोल्या पावसात ओल्या होत आहेत तसेच संपूर्ण इमारतीला विद्युत प्रवाह उतरला असल्याने रुग्णांना व कर्मचाऱ्यांना आपला जीव मुठीत धरून काम करावे लागत आहे. त्यामुळे सदर इमारतीचे आयुर्मान देखील संपत आले असले तरी संपूर्ण इमारत निर्लेखित करणे गरजेचे आहे. याबाबत संबंधित यंत्रणेला वेळेवेळी ग्रामस्थांनी सूचना देखील केल्या आहेत परंतु संबंधित विभागाने इमारत निर्लेखित करण्यास उत्सुक नसल्याचे सांगण्यात आले असल्याचे समजते आहे.याबाबत तालुका वैद्यकीय अधिकारी सुधीर पाटील यांचेशी संपर्क केला असता त्यांच्या म्हणण्यानुसार देवळा बांधकाम विभाग इ व द अभियंता यांचेशी चर्चा केली असता इमारत दुरुस्ती करण्यास समर्थता दाखविली आहे.दरम्यान गेल्या कित्येक दिवसांपासून सदर इमारतीची दुरावस्था झाली असून संबंधित विभाग इमारतीचा आणखी छत कोसळून एखादी दुर्घटना होण्याची वाट बघता की काय असा सवाल सर्वसामान्य जनतेला पडला आहे.याबाबत ग्रामस्थांचे एक शिष्टमंडळ लवकरच आमदार डॉ. राहुलदादा आहेर यांची भेट घेत नवीन इमारत बांधून मिळावी यासाठी साकडे घालणार आहेत
तसेच ह्या प्राथमिक आरोग्य केंद्रात मंजूर पदांपैकी निम्म्याहून अधिक पदे देखील रिक्त असुन ते देखील त्वरित भरण्यात यावेत अशी देखील मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here