Home बुलढाणा बच्चू कडूंचे निर्देश… संग्रामपूर शहर विकासाची ब्ल्यू प्रिंट तयार करा!; नगरपंचायतीत बैठक. 

बच्चू कडूंचे निर्देश… संग्रामपूर शहर विकासाची ब्ल्यू प्रिंट तयार करा!; नगरपंचायतीत बैठक. 

394
0

राजेंद्र पाटील राऊत

बच्चू कडूंचे निर्देश… संग्रामपूर शहर विकासाची ब्ल्यू प्रिंट तयार करा!; नगरपंचायतीत बैठक.                           संग्रामपूर (ब्यूरो चिफ स्वप्निल देशमुख यूवा मराठा न्यूज बूलडाणा ) ः संग्रामपूर शहर विकासाला मोठा वाव आहे. शहराच्या शाश्वत विकासासाठी मोठे काम करावयाचे आहे. शहरात रस्ते, नाल्या, शाळा, आरोग्याची सुविधा, घरकुल तसेच पाणीपुरवठा याबाबत समीक्षा करून विकास करावा लागणार आहे. त्यासाठी संग्रामपूर शहर विकासाची ब्लू प्रिंट तयार करावी, अशी सूचना जलसंपदा, महिला व बालविकास, शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी आज, ६ मार्चला संग्रामपूरमध्ये केली.

संग्रामपूर नगरपंचायत सभागृहात शहर विकासासाठी विविध विषयांवर आढावा बैठक घेण्यात आली. त्यावेळी राज्यमंत्री श्री. कडू बोलत होते. यावेळी नगराध्यक्षा उषा सोनोने, उपाध्यक्ष संतोष सावतकर, उपविभागीय महसूल अधिकारी वैशाली देवकर, नगर प्रशासन विभागाचे श्री. अकोटकर, तहसीलदार श्री. वरणगावकर, मुख्याधिकारी प्रशांत शेळके, कार्यालय अधीक्षक शरद कोल्हे आदींसह नगरसेवक उपस्थित होते.

Previous articleबिल्लाळी ता. मुखेड येथे हरबरा खरेदी केंद्राचा भव्य शुभारंभ.
Next articleभोर वेल्हा मुळशीचे कार्यसम्राट आमदार
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here