Home माझं गाव माझं गा-हाणं ताहाराबाद बसस्थानकाचे नाव युनोस्कोच्चा यादित सामिल , निष्क्रिय प्रशासन ,लोकप्रतिनिधी यांचे मनापासुन...

ताहाराबाद बसस्थानकाचे नाव युनोस्कोच्चा यादित सामिल , निष्क्रिय प्रशासन ,लोकप्रतिनिधी यांचे मनापासुन धन्यवाद श्री.गजानन साळवे.

705
0

राजेंद्र पाटील राऊत

ताहाराबाद बसस्थानकाचे नाव युनोस्कोच्चा यादित सामिल , निष्क्रिय प्रशासन ,लोकप्रतिनिधी यांचे मनापासुन धन्यवाद श्री.गजानन साळवे.
सटाणा,(जगदिश बधान विभागीय प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क)
ताहाराबाद राष्ट्रीय महामार्गावरील नाशिक जिल्ह्यातील शेवटचे महत्त्वाचे गाव पुर्वला नामपुर आहे पश्चिमेला साल्हेर किला ,डांग जिल्हा आहे ऊत्तरेला पिंम्पळनेर आहे व दक्षिणेकडे नाशिक आहे . हा अति महत्त्वाचा महामार्ग आहे . दररोज हजारो वहानाची आवाजाही सुरू आहे . यात पिंम्पळनेर – ताहाराबाद – सटाणा हा महामार्ग पुर्णपणे खड्डेमय झाला आहे . यावर प्रवास करणे म्हणजे मोत का कुवा झालय कधि काय होईल सांगता येत नाही . याच प्रकारे ताहाराबाद येथील महाराष्ट्र शासनाचे भव्यदिव्य असे करोडो रूपये खर्च करून काय अवस्था झाली आहे ते प्रत्यक्षात पाहिले पाहिजे . काल रात्री आकाश गंगेतुन ३/४ मोठे अवाढव्य ऊलकापिंड ताहाराबाद बसस्थानकात जोरात पडले यामुळे ताहाराबाद बसस्थानकात ऊलकापिंडमुळे अति महाकाय खड्डे पडुन मोठे पाण्याचे सरोवर निर्माण झाले आहे . हजारो वर्षापूर्वी बुलढाणा जिल्ह्यात लोणार येथे असेच ऊलकापिंड पडुन महाकाय तलाव तयार झाला त्याच प्रकारे ताहाराबाद बसस्थानकातील हे ४/५ मोठ मोठे ऊलकापिंड पडल्याने खड्डे तयार झाले आहे . हि बातमी कळताच अमेरीकतील अंतराळात संशोधन करणारी नासा संस्थेने तातडीने आपली पथक ताहाराबाद बसस्थानकात येथे पहाणीसाठी पाठवले आहे .आज या अति भव्य विशाल खड्यामळु जागतिक नकाशावर ताहाराबाद बसस्थानकाचे नाव घेण्यात येत आहे .यामुळे स्थानिक लोकप्रतिनिधी, प्रशासनाने यांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन .यामुळे युनोस्कोने ऐतिहासिक वास्तु म्हणुन ताहाराबाद बसस्थानक घोषणेच्चा तयारीत आहे . या भव्य दिव्य खड्यामुळे शासकीय एस टी वहाने बसस्थानकात प्रवेश करत नाही . अनेक बस चेसी बेंड झाल्या आहेत .प्रवाशी ताहाराबाद बसस्थानकात येताच जिव मुठीत घेऊन बसतात . जोरात झटक्याने ईकडचा प्रवासी तिकडे फेकला जातो . अनेक जेष्ठ नागरिकांना यामुळे कब्बंर ,घुडगे ,मनक्याचे आजार निर्माण झाले आहे . आता भारत सरकारकडे नविन पर्यटन स्थळ म्हणुन ताहाराबाद बसस्थानकाची निवड प्रक्रिया सुरू होत आहे . लकरच दिल्लीतील शिष्ठमंडळ ताहाराबाद येथे पहाणीस येत आहे . आत्ताच सर्व नागरिकांना बसस्थानकातील ऊल्कापिंडी मुळे पडलेले खड्डे पाहुन घेण्याची संधी आहे नाहीतर भविष्यात स्थानिक प्रशासन त्याला टिकीट दर लावुन आत बसस्थानकात प्रवेश देणार आहे.

Previous articleदेवळा येथे भव्य रक्तदान शिबिर आयोजन
Next article🛑 वयाच्या ७१ वर्षी ‘या’ अभिनेत्याने बनवली ४५ वर्षीय व्यक्तीसारखी मस्क्युलर बॉडी, ट्रान्सफॉर्मेशन पाहून होतील बत्त्या गुल
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here