Home पुणे 🛑 वयाच्या ७१ वर्षी ‘या’ अभिनेत्याने बनवली ४५ वर्षीय व्यक्तीसारखी मस्क्युलर बॉडी,...

🛑 वयाच्या ७१ वर्षी ‘या’ अभिनेत्याने बनवली ४५ वर्षीय व्यक्तीसारखी मस्क्युलर बॉडी, ट्रान्सफॉर्मेशन पाहून होतील बत्त्या गुल

164
0

राजेंद्र पाटील राऊत

🛑 वयाच्या ७१ वर्षी ‘या’ अभिनेत्याने बनवली ४५ वर्षीय व्यक्तीसारखी मस्क्युलर बॉडी, ट्रान्सफॉर्मेशन पाहून होतील बत्त्या गुल 🛑
✍️ सिनेसृष्टी 🙁 विलास पवार पुणे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

सिनेसृष्टी:- प्रत्येक कलाकार मुख्य अभिनेता- अभिनेत्रींप्रमाणे स्वतःला फिट आणि हेल्दी ठेवतात. पूर्वीच्या काळी फिटनेसचे वेड फक्त मुख्य कलाकारांपुरतेच मर्यादित होते. मात्र, काळानुसार कलाकार आणि त्यांचा फिटनेसच्या संकल्पना देखील बदलत गेल्या. आज जर आपण इंडस्ट्रीमध्ये पाहिले, तर अनिल कपूरपासून ते अक्षय कुमारपर्यंत सर्वच कलाकार पन्नाशी पार केल्यानंतरही अगदी पंचविशीतील वाटतात.

आज तुम्हाला अशा एका कलाकाराबद्दल सांगणार आहोत, ज्यांनी सत्तरी ओलांडूनही ते अगदी तिशीतल्या तरुणासारखे वाटतात.

या अभिनेत्याचे नाव आहे शरत सक्सेना. ८०/९० च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेते शरत त्यांच्या खलनायकी आणि सहाय्यक भूमिकांमुळे लक्षात राहतात. शरत यांनी नुकताच त्यांचा एक फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. त्यांचा हा फोटो एका जिममधला असून या फोटोत ते अतिशय फिट आणि त्यांची मस्क्युलर बॉडी फ्लॉन्ट करताना दिसत आहेत. वयाची सत्तरी ओलांडूनही शरत यांनी त्यांच्या मेहनतीने अतिशय फिट असे शरीर कमावले आहे.

शरत यांचे काही फोटो व्हायरल होत आहेत. त्यात असे म्हटले आहे की, “मी ७१ वर्षांचा झालो आहे. मात्र, तरीही मी ४५ वर्षांचा दिसावा यासाठी प्रयत्न करत आहे. एक अभिनेता म्हणून हे सर्वात कठीण काम आहे.”
शरत यांनी एका मुलाखतीमध्ये सांगितले होते की, “मी खूप स्नायूयुक्त शरीराचा होतो. ७०/८० च्या दशकात असे असणे एक गुन्हाच होता. कारण बॉडीबिल्डर लोकांना डोके कमी असते, अशिक्षित, भावना नसलेले आणि अभिनय न येणारे असे समजले जायचे. मात्र, आज सर्व बदलले आहे.

मी आज ७१ वर्षांचा असलो तरी ४५ दिसण्याचा प्रयत्न करत आहे. नाहीतर मला कोणी काम देणार नाही आणि इंडस्ट्रीमधून मला बाहेर काढण्यात येईल.

मी ६०० पेक्षा अधिक ऍक्शन सीन्स केले असून, ते करताना मी १२ वेळा हॉस्पिटलमध्ये देखील भरती झालो आहे.” शरत सक्सेना यांनी चित्रपटांमध्ये स्वतःच सर्व ऍक्शन सीन केले आहेत.‘मिस्टर इंडिया’, ‘अग्निपथ’, ‘त्रिदेव’, ‘गुलाम, ‘बॉडीगार्ड’, ‘क्रिश’, ‘बजरंगी भाईजान’, ‘बागबान’ आदी अनेक भाषांमधील ३०० पेक्षा अधिक चित्रपटांमध्ये शरत यांनी निगेटिव्ह, पॉझिटिव्ह अशा अनेक भूमिका साकारल्या आहेत.⭕

Previous articleताहाराबाद बसस्थानकाचे नाव युनोस्कोच्चा यादित सामिल , निष्क्रिय प्रशासन ,लोकप्रतिनिधी यांचे मनापासुन धन्यवाद श्री.गजानन साळवे.
Next articleबारामतीतील बर्‍हाणपूर येथील उपमुख्यालयात पोलिसांच्या 300 जागा भरल्या जाणार..!
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here