Home भंडारा मायलेकीवर चाकू हल्ला करणाऱ्या विश्वासची कारागृहात रवानगी..

मायलेकीवर चाकू हल्ला करणाऱ्या विश्वासची कारागृहात रवानगी..

75
0

आशाताई बच्छाव

IMG_20240305_062500.jpg

मायलेकीवर चाकू हल्ला करणाऱ्या विश्वासची कारागृहात रवानगी..
प्रेमप्रकरणातून केला प्राणघातक हल्ला ;आरोपीस १८ मार्च पर्यंत न्यायालयीन कोठडी

संजीव भांबोरे
भंडारा (जिल्हा प्रतिनिधी) तू माझ्याशी बोलत का नाही. तुझे म्हणणे काय आहे.असे म्हणत घरात शिरून महिलेवर व तिच्या अल्पवयीन मुलीवर प्रेम प्रकरणातून चाकूने प्राणघातक हल्या प्रकरणी तीन दिवस पोलीस कोठडीत असलेल्या आरोपी विश्वास सुरेंद्र चंद्रिकापुरे (२४) रां. गौतम नगर तुमसर यांना दिनांक ४ मार्च (सोमवारी) तुमसर न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी न्यायालयाने चंद्रिकापुरे यांना १८ मार्च पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली.
प्रकरण असे की, घरात बसलेल्या महिलेवर व तिच्या अल्पवयीन मुलीवर एका युवकाने घरात प्रवेश करुन तु माझ्याशी बोलत का नाही तुझे म्हणणे काय आहे.असे म्हणत आरोपी विश्वास चंद्रिकापुरे यांनी खिश्यातुन चाकु काढुन अल्पवयीन मुलीवर मारण्यास धावला मुलीची आईने प्रतिकार केला असता आरोपीने तिच्या आईच्या गळ्यावर चाकु मारुन गंभीर जखमी केले.मुलगी भितीने घरा समोर पळायला गेली असता आरोपी विश्वास हा तीचे मागे धावुन शेजारचे घरी जावुन अल्पवयीन मुलीच्या डाव्या पायाला चाकु मारुन जखमी केले.यात सीमा धनजय उके (४५) व १७ वर्षीय मुलगी रां. दुर्गानगर असे जखमी मायलेकीचे नाव आहे.विश्वास सुरेंद्र चंद्रिकापुरे (२४) असे अटक झालेल्या आरोपीचे नाव आहे.गंभिर दुखापत झाल्याने माय लेकीला रुग्णालयात दाखल करण्यात आले.सध्या आईवर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरुच आहे तर अल्पवयीन मुलीला घटनेच्या दिवशीच सुट्टी देण्यात आली होती.जखमीं सिमा उके ची प्रकृती सध्या धोक्याबाहेर आहे.या प्रकरणात माय लेकीला जिवाने ठार मारण्याचा प्रयत्न करणारा आरोपी विश्वास सुरेंद्र चंद्रिकापुरे या आरोपीविरोधात भारतीय दंड विधानाच्या कलम ४५२,३२४,३०७ नुसार तुमसर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता.शनिवारी आरोपी विश्वास सुरेंद्र चंद्रिकापुरे याला अटक करण्यात आली तर त्याला न्यायालयाने ४ मार्च पर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती.सोमवारी आरोपी विश्वास ला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आरोपीस १८ मार्च पर्यंत १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली असल्याची माहिती आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here