Home अमरावती कुणबी प्रमाणपत्राची कार्यपद्धती निश्चित करणारे समिती आज अमरावती: न्या. संदीप शिंदे यांच्यासह...

कुणबी प्रमाणपत्राची कार्यपद्धती निश्चित करणारे समिती आज अमरावती: न्या. संदीप शिंदे यांच्यासह इतर सदस्य येणार.

77
0

आशाताई बच्छाव

IMG_20231121_062751.jpg

कुणबी प्रमाणपत्राची कार्यपद्धती निश्चित करणारे समिती आज अमरावती: न्या. संदीप शिंदे यांच्यासह इतर सदस्य येणार.
————–
दैनिक युवा मराठा
पी एन देशमुख.
अमरावती विभागीय संपादक.
अमरावती.
पात्र व्यक्तींना कुणबी जातीचे प्रमाणपत्र देण्याबाबत कार्यपद्धती निश्चित करणारे समिती बुधवारी आज 22 नोव्येहेंबरला येत आहे. अमरावती विभागातील जिल्हा अधिकाऱ्यांशी चर्चा करून ते यावेळी कुणबी प्रमाणपत्र अदा करण्याबाबतची कार्यपद्धती विदीत करतील. समितीचे अध्यक्ष हे निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे आहेत. ते आणि त्यांच्यासोबत समितीचे इतर सदस्य यांचे प्रारंभी नागपुरात आगमन होईल. त्यानंतर मोटारी नेते अमरावतीपासून विभागीय आयुक्त कार्यालयात बैठक घेतील. ही बैठक विभागीय आयुक्त कार्यालयात ११.३० वाजता सुरू होणार आहे. सध्या राज्यात मराठा म्हणून ओळखला जाणाऱ्यांची आरक्षण ची मुद्दा तीव्र केला आहे. या पार्श्वभूमीवर ज्या मराठ्यांच्या दस्तऐवजामध्ये प्राचीन काडी कुणबी म्हणून उल्लेख असेल, अशांना कुणबी जातीचे प्रमाणपत्र देऊन त्यांना आरक्षण चे कवच पुरविण्याचे शासनाने ठरविले आहे. त्यासाठी प्रत्येक जिल्हास्तरावर लोडल ऑफिसर ची नियुक्ती करण्यात आली असून यांच्यामार्फत दस्तऐवज गोरा केला जात आहे. अमरावतीत ही जबाबदारी निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. विवेक घोडके यांच्याकडे सोपीनाथ आली असून त्यांच्याकडे प्राप्त झालेल्या दस्तऐवजाची सदर समिती पडताळणी करणार आहे. सदर बैठकीसाठी विभागातील सर्व पाचही जिल्ह्याचे, जिल्हा परिषद चे सीइओ, विशेष पोलीस महानिरीक्षक, पोलीस आयुक्त, जिल्हा पोलीस अधीक्षक, मुद्रांक जिल्हाधिकारी, भूमी अभिलेखा खात्याचे उपसंचालक, कारागृह अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे जिल्हास्तरीय अधिकारी आदींना उपस्थित राहण्याचे कळविण्यात आले आहे. विभागीय आयुक्त डॉ. निधी पांडेय आणि उपयुक्त (महसूल) संजय पवार व त्यांचे सहकारी या बैठकीच्या तयारीला लागले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here