राजेंद्र पाटील राऊत
साईपालखी यात्रेचे ठेंगोडयात
जंगी व उत्साहात स्वागत…!!
दानशूर अण्णासाहेब पगारेचा मोलाचा वाटा!
सटाणा,(नयन शिवदे विशेष प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क)- प्रतिवर्षाप्रमाणे सटाणा (यशवंतनगरी) येथून शिर्डीला पायी पदयात्रेला जाणाऱ्या
साईपालखीचे आज ठेंगोडयात आगमन होताच,ठेंगोडा ग्रामपंचायत प्रशासन व ग्रामस्थांकडून साईपालखीचे जंगी स्वागत करण्यात आले.यावेळी ठेंगोडा गावातून साईपालखीची भव्य मिरवणूक काढण्यात आली.तर सरपंच सौ.चिंधाताई पगारे ,उपसरपंच नारायण निकम यांच्या शुभहस्ते साईबाबांची आरती करण्यात येऊन गावात विविध ठिकाणी साईबाबांच्या पालखीचे पुजन करण्यात येऊन दर्शनाचा लाभ भाविक भक्तांनी घेतला.
सटाणा येथून दरवर्षी शिर्डी येथे पायी जाणाऱ्या या साईभक्तांच्या पदयात्रेला ठेंगोडा येथील दानशूर व्यक्तीमत्व म्हणून ओळखले जाणारे अण्णासाहेब पगारे हे आपल्या परंपरेनुसार अन्नदान महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित करतात,आजदेखील अण्णासाहेब पगारे यांनी आयोजित केलेल्या अन्नदान महाप्रसादाचा लाभ ठेंगोडावासियांनी घेतला.अण्णासाहेब पगारे हे फक्त ठेंगोडा गाव परिसरातच नव्हे तर संपूर्ण नाशिक जिल्ह्यात एक सामाजिक कार्यातील नावलौकिकप्राप्त व्यक्तीमत्व म्हणून त्यांची ओळख आहे.गोरगरीब व सर्वसामान्य नागरिकांच्या सुख दुःखात सदैव सक्रीय असणाऱ्या अणौणासाहेब पगारे यांच्या या दातृत्वाचे सर्वत्र कौतुक व अभिनंदन होत आहे.