Home नांदेड डॉ.उत्तमराव सोनकांबळे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरदचंद्र पवार यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या...

डॉ.उत्तमराव सोनकांबळे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरदचंद्र पवार यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या शुभहस्ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश

226
0

राजेंद्र पाटील राऊत

डॉ.उत्तमराव सोनकांबळे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरदचंद्र पवार यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या शुभहस्ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश

नांदेड जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला अव्वल क्रमांकावर आणन्यासाठी कटीबध्द असल्याचे डॉ.उत्तमराव सोनकांबळे यांचे प्रतिपादन

नांदेड,ब्युरो चीफ मनोज बिरादार युवा मराठा न्युज नेटवर्क 

नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुक्यातील कल्हाळी या (हुतातम्यांचे गाव) या ऐतिहासिक
गावातील भुमिपुत्र डॉ.उत्तमराव सोनकांबळे हे मागील तिस ते चाळीस वर्षांपासून, सामाजिक चळवळीच्या माध्यमातून गोर- गरीब,निराधार जनसामान्यांचे विविध प्रश्न व अन्याय अत्याचाराविरुद्ध बुलंद आवाज उठवून विविध प्रकारचे धरणे, मोर्चे,आंदोलनांच्या माध्यमातून
जनसामान्यांना न्याय मिळवून दिलेल अतिशय कुशल अस व्यक्तिमत्व डॉ.उत्तमराव सोनकांबळे यांच राहीलेल आहे.
तसेच अनु .जाती / जमाती / विजा-भज/इ.मा.व./ वि.मा.प्र.शासकीय/ निमशासशीय अधिकारी/कर्मचारी संघटना महाराष्ट्र राज्य मंत्रालय मुंबई (मा.भारत वानखेडे प्रणित) या संघटनेच्या माध्यमातून शासकीय व निमशासकीय अधिकारी कर्मचारी यांच्यावरील अन्याय अत्याचारावर त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी लढा दिला.
काल दि.१३ जानेवारी २०२२ रोजी मुंबई येथील राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या प्रदेश कार्यालयात राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा तथा राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्र पवार यांच्या अध्यक्षतेखाली व त्यांच्या शुभहस्ते आणि प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील (जलसंपदा मंत्री,महाराष्ट्र राज्य),
ना.संजय बनसोडे (राज्यमंत्री – पर्यावरण व वातावरणीय बदल,पाणी पुरवठा व स्वच्छता सार्वजनिक बांधकाम सा.उ. रोजगार हमी भूकंप पुनर्वसन संसदीय कार्ये महाराष्ट्र राज्य मंत्रालय मुंबई), ना.नवाब मलीक ( अल्पसंख्याक मंत्री),मा.आनंदजी शिंदे,खासदार फौजिया खान,मा.आ. बाबाजानी दुर्रानी यासह विविध मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितत डॉ.उत्तमराव सोनकांबळे यांच्यासह वंचित (नांदेड) चे माजी जिल्हा महासचिव अॅड.बाळसाहेब
सोनकांबळे,ईलीयास सय्यद (वंचीत- नांदेड माजी जिल्हा महासचिव,राष्ट्रवादीचे विशाल गायकवाड, भाजपा चे अक्षय सोनकांबळे, लक्ष्मण बोडके इत्यादींनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला. या पक्ष प्रवेश सोहळ्या दरम्यान डॉ.उत्तमराव सोनकांबळे यांनी नांदेड जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला अव्वल क्रमांकावर आणन्यासाठी तन, मन,धनाने काम करण्यासाठी कटीबध्द असल्याचे पक्ष प्रवेश सोहळ्या दरम्यान बोलताना आपले मत व्यक्त केले.
त्यांच्या या राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष प्रवेशाबद्दल मा.भारत वानखेडे (प्रणीत) अ.जा.ज.इ.मा.व.वि.जा.भ.ज.
शासकीय/ निमशासकीय अधिकारी कर्मचारी मंत्रालयीन पशु चिकित्सक संघटनेचे महाराष्ट राज्य अध्यक्ष
डॉ.राहुल कांबळे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी व त्यांच्या समर्थकांनी डॉ.उत्तमराव सोनकांबळे यांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष प्रवेशाबद्दल अभिनंदन करुन त्यांना पुढील कार्यास शुभेच्छा देत त्यांच्यावर आभिनंदनाचा वर्षाव केला असून लोहा – कंधार विधानसभा मतदार संघातील येणाऱ्या पं.स.जिल्हा परिषद निवडणूकी मध्ये डॉ.उत्तमराव सोनकांबळे यांच्या पक्ष प्रवेशाने मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला एकतर्फी यश मिळेल कारण, डॉ.उत्तमराव सोनकांबळे यांचा लोहा – कंधार विधानसभा मतदार संघात मोठ्या जनसमुदायाचा पगडा असून लोहा – कंधार विधानसभा मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला अच्छे दिन येणार असे मतदार संघात बदलाचे वारे वाहू लागत असल्याचे मतदार संघातील जनतेतून बोलल्या जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here