राजेंद्र पाटील राऊत
केशव पा.इंगोलें यांना जिल्हा परिषदेचा कृषिनिष्ठ पुरस्कार
पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते प्रदान…
नांदेड / ब्युरो चीफ मनोज बिरादार युवा मराठा न्युज नेटवर्क
जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते नांदेड जिल्हा परिषदेच्या वतीने दिला जाणारा “कृषीनिष्ठ पुरस्कार” मुखेड खरेदी विक्रि संघाचे संचालक तथा बेरळी गावचे कृषिनिष्ठ शेतकरी केशव पाटील इंगोले यांना देवून गौरव करण्यात आला.
यावेळी आ.अमरनाथ राजूकर,आ.मोहन हबंर्डे, माजी आ.डी.पी.सांवत, माजी आ.हणमंतराव पा.बेटमोगरेकर, माजी आ.ओमप्रकाश पोकर्णा,जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ.मंगाराणी अंबुलगेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी सौ.वर्षा ठाकुर, कृषी व पशु संवर्धन सभापती रावणगावकर,बेरळीचे माजी उपसरपंच सुरेश पा.बेळीकर आदींची प्रमुख उपस्थिती होती. इंगोले यांना कृषीनिष्ठ पुरस्कार मिळाल्याबद्दल जेष्ठ नेते किशनराव राठोड, आ.तुषार राठोड,माजी आ.हणमंतराव पा.बेटमोगरेकर,माजी आ.सुभाषराव साबणे, माजी आ.अविनाश घाटे,जि.प.चे माजी अध्यक्ष दिलीप पा.बेटमोगरेकर,भाजपाचे जिल्हाध्यक्ष व्यंकटराव पा.गोजेगावकर, नगराध्यक्ष बाबुराव देबडवार, माजी नगराध्यक्ष गंगाधर राठोड,पंचायत समिती सभापती प्र.लक्ष्मण पा.खैरकेकर,कृउबा सभापती खुशाल पा.उमरदरीकर, उपसभापती प्र.मनोज गोंड,कृउबा उपसभापती व्यंकटराव सुभेदार, माजी जि.प.सदस्य बंळवतराव पा.बेटमोगरेकर आदिंसह मित्रपरिवारातुन अभिनंदनाचा वर्षाव होत आहे