Home नांदेड अंगणवाडी सेविकांचे कार्य सामाजिक उत्तरदायित्वाचे आदर्श प्रतीक – आमदार बालाजी कल्याणकर

अंगणवाडी सेविकांचे कार्य सामाजिक उत्तरदायित्वाचे आदर्श प्रतीक – आमदार बालाजी कल्याणकर

53
0

आशाताई बच्छाव

IMG-20220903-WA0010.jpg

अंगणवाडी सेविकांचे कार्य सामाजिक उत्तरदायित्वाचे आदर्श प्रतीक – आमदार बालाजी कल्याणकर
नांदेड जिल्हा ब्युरो चीफ मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
नांदेड (जिमाका) दि. 2 :- अंगणवाडी सेविका विविध आव्हानांवर मात करत केवळ शासकीय सेवा म्हणून नव्हे तर सामाजिक उत्तरदायित्व म्हणूनही तेवढ्याच जबाबदारीने आपले कर्तव्य पार पाडीत असतात. तुमचे योगदान व हे काम करतांना येणाऱ्या अडचणी मी जाणून असून अंगणवाडी दुरूस्ती पासून ते इतर सेवा-सुविधा कसा उपलब्ध करता येतील याबाबत सर्वतोपरी सहकार्य केले जाईल, असे प्रतिपादन आमदार बालाजी कल्याणकर यांनी केले. बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालय नागरी प्रकल्प अंतर्गत अंगणवाडी तरोडा बु. येथे आयोजित राष्ट्रीय पोषण माह 2022 या कार्यक्रमात ते बोलत होते.

यावेळी जिल्हा परिवीक्षा अधिकारी खानापुरकर, परिविक्षा अधिकारी जिंदमवार, राष्ट्रमाता विद्यालयाचे संचालक अवधुत क्षीरसागर, मुख्याध्यापक नरवाडे, श्री. शहाणे, श्री. सुर्यवंशी यांची उपस्थिती होती. पोषण माहमध्ये विविध उपक्रम राबविण्यात येणार असून यात पोषण रॅली, ॲनिमिया कॅम्प, महिला व किशोरींना मार्गदर्शन करणे, स्वस्थ बालक-बालिका स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुषमा शिसोदे यांनी केले तर सुत्रसंचलन मुख्यसेविका वैशाली मेघमाळे यांनी केले. शेवटी आभार रेखा पडोळे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी मुख्यसेविका अर्चना शेटे, शकुंतला पेंद्र, प्रतिभा खिराडे, सुनंदा ढाकरे, सेविका व मदतनिस यांनी परिश्रम घेतले.

Previous articleमुरुमगाव येथे विविध समस्येच्या निराकरणासाठी भव्य चक्काजाम आंदोलन लेखी आश्‍वासनानंतर आंदोलन घेतले मागे
Next articleशेतकरी कार्डधारकांना बंद करण्यात आलेले धान्य त्वरित सुरू करा किसान एकता संघ
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here