Home बुलढाणा शेतकरी कार्डधारकांना बंद करण्यात आलेले धान्य त्वरित सुरू करा किसान एकता संघ

शेतकरी कार्डधारकांना बंद करण्यात आलेले धान्य त्वरित सुरू करा किसान एकता संघ

68
0

आशाताई बच्छाव

IMG-20220903-WA0018.jpg

शेतकरी कार्डधारकांना बंद करण्यात आलेले धान्य त्वरित सुरू करा किसान एकता संघ
जळगाव जामोद,(प्रतिनिधी सतिश पाटील)
गेल्या दोन महिन्या पासून शासनाने शेतकरी कार्डचारकांना मिळणारे धान्य बंद केले आहे त्यामुळे गरीब शेतकऱ्यांना ऐन सणासुदीच्या काळात धान्यापासून वंचीत राहावे लागले आहे. परिणामी खुल्या बाजारपेठेतून जास्त दराने धान्य खरेदी करावे लागत आहे. ज्यामुळे शेतकरीकार्डधारक आर्थीक व मानसीक तनावात जिवन जगत आहेत. यासह अंत्योदय कार्डधारकाना आजरोजी 4 किलो तांदुळ व 1 किलो गहु प्रति मानसी देण्यात येत आहे तर बीपीएल कार्डधारकांना प्रति मानसी 3 किलो तांदुळ व 2 किलो गहू देण्यात येत आहे. मिळणारे धान्य कमी प्रमाणात असून गहू धान्य पुर्वीप्रमाणेच सूरू ठेवण्यात यावे. शासनामार्फत मिळणारा तांदुळ कुटूंबाजवळ खुप मोठ्याप्रमाणात जमा होत असून सदर तांदुळ अवैधरित्या खुल्या बाजारात विक्री केला जातो त्यामुळे शासनाची दिशाभूल होत आहे. करिता तांदुळ कमी करण्यात येवून त्याऐवजी 1 किलो गहू प्रति व्यक्ती वाढवून देण्यात यावा. मागील 3-4 वर्षापासून पुरवठा विभागाकडून नवीन शिधापत्रिका प्रदान करण्यात आलेल्या आहेत मात्र अदयापही त्यांना मालसाठा मिळत नाही ही जनतेची दिशाभूल करण्यासारखे असून त्वरीत अशा कार्डधारकांना धान्य साठा सुरू करण्यात यावा. वरील मागण्या मान्य न झाल्यास दिनांक 12/9/2022 रोजी आपल्या कार्यालयासमार किसान एकता संघाच्या वतीने तिव्र जनआंदोलन करण्यात येईल. अशा आशयाचे निवेदन सादर करण्यात आले. यावेळी मुख्य मार्गदर्शक म्हणून माननीय देवेंद्र प्रताप सोमवंशी राष्ट्रीय सचिव तथा दीपक म्हसाळ प्रदेश सचिव यांच्या मार्गदर्शनात सौ मीना पात्रीकर महिला जिल्हाध्यक्ष वाहतूक सेल बुलढाणा ज्ञानेश्वर बाहेकर तालुकाध्यक्ष गणेश सिंह परिहार जिल्हा कलाकार किसान एक प्रसंग यांच्यामार्फत तहसीलदार श्रीमती शितल सोलाट यांनी निवेदन स्वीकारले.
दिनांक 01/09/2022

Previous articleअंगणवाडी सेविकांचे कार्य सामाजिक उत्तरदायित्वाचे आदर्श प्रतीक – आमदार बालाजी कल्याणकर
Next articleदेवरूखात माझा गणपती माझा मताधिकार देखावा ठरतोय कौतुकाचा विषय
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here