Home रत्नागिरी देवरूखात माझा गणपती माझा मताधिकार देखावा ठरतोय कौतुकाचा विषय

देवरूखात माझा गणपती माझा मताधिकार देखावा ठरतोय कौतुकाचा विषय

41
0

आशाताई बच्छाव

IMG-20220903-WA0014.jpg

देवरूखात माझा गणपती माझा मताधिकार देखावा ठरतोय कौतुकाचा विषय

देवरूख (सुरेश सप्रे) : दरवर्षी येणाऱ्या गणेशोत्सवातून जनतेचे प्रबोधन करावे हा उद्देश मनात ठेवून यावर्षी सुनिल करंबेळे परिवाराने लोकशाहीच्या बळकटीसाठी “माझा गणपती माझा मताधिकार” हा देखावा न्यू इंग्लिश स्कूल देवरुख जवळील गुरुकुल नगर मध्ये आपल्या निवासस्थानी उभा केला आहे..

या देखाव्यामध्ये त्यांनी मतदान करताना आपण कोणत्या उमेदवाराला मतदान करावे, ‘उमेदवार कसा नसावा’, मतदान का केले पाहिजे, मतदान प्रक्रियेमध्ये आता पर्यंतचे बदल, मतदान ओळखपत्राशी आधार कार्ड कसे लिंक करावे, आतापर्यंतची मतदानाची टक्केवारी चित्ररूपात व घोषवाक्यांद्वारे दाखवला आहे. अठरा वर्षे पूर्ण होताच नमुना ६ कसा भरावा, नावात बदल असल्यास नमुना ८ कसा भरावा याची माहिती दिली आहे. तसेच ‘मी लोकशाही बोलते आहे’, या श्राव्य ध्वनीच्या माध्यमातून आलेल्या गणेश भक्तांना स्वराज्याचे रूपांतर सुराज्यात करण्यासाठी काय केले पाहिजे हे ऐकविले जाते. तसेच या विषयाला धरून मी मतदान करणारच या विषयावर रांगोळी ही रेखाटली आहे. हा देखावा उभा करण्यास परिवारातील सदस्यांप्रमाणे महारुद्र फनिश्चरचे मालक किरण जोयशी,;पदवीधर शिक्षक विनय होडे, विद्यार्थीनी दिशा कोटकर यांचे सहकार्य मिळाले.

यापूर्वीही गणेश भक्तांच्या प्रबोधनासाठी पर्यावरण रक्षण, प्लास्टिक मुक्ती अमृत महोत्सवी भारताची वाटचाल इत्यादी विषयांच्यावर देखावे उभे करण्याचे काम या परिवाराने करून स्पर्धेत ही यश मिळविले आहे .

Previous articleशेतकरी कार्डधारकांना बंद करण्यात आलेले धान्य त्वरित सुरू करा किसान एकता संघ
Next articleरत्नागिरी येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यास राज्य शासनाची मान्यता : मंत्री उदय सामंत
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here