Home रत्नागिरी रत्नागिरी येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यास राज्य शासनाची मान्यता : मंत्री...

रत्नागिरी येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यास राज्य शासनाची मान्यता : मंत्री उदय सामंत

36
0

आशाताई बच्छाव

IMG-20220903-WA0015.jpg

रत्नागिरी येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यास राज्य शासनाची मान्यता : मंत्री उदय सामंत

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास युती सरकारकडून ₹ ५२२ कोटींच्या निधीस मंजुरी

रत्नागिरी ,(सुनील धावडे): मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील युती सरकार हे सर्वसामान्य नागरिकांसाठी कार्यरत असणारे आपले सरकार आहे. जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांना दर्जेदार आरोग्य सुविधा मिळाव्यात यास्तव रत्नागिरी येथे सुरू होणाऱ्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास युती सरकारने ₹ ५२२ कोटी निधी मंजूर केला असल्याची माहिती राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आज येथे दिली.

श्री.सामंत म्हणाले, रत्नागिरी येथे १०० विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व त्यास संलग्नित जिल्हा सामान्य रुग्णालयाचे श्रेणीवर्धन करुन ४३० रुग्णखाटांचे जिल्हा रुग्णालय केंद्र शासनाच्या मान्यतेनंतर सुरु करण्यास मान्यता देणारा शासन निर्णय आज निर्गमित करण्यात आला आहे.

या प्रस्तावित शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे नाव “शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा सामान्य रुग्णालय, रत्नागिरी” असे करण्यास मान्यता देण्यात आल्याची माहिती श्री.सामंत यांनी दिली.

श्री. सामंत म्हणाले, रत्नागिरी जिल्ह्याचा बराचसा भाग ग्रामीण असल्यामुळे येथील जनतेस दर्जेदार व परवडण्याजोग्या वैद्यकीय सुविधांचा अभाव जाणवत होता. सद्य:स्थितीत रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सार्वजनिक आरोग्य सेवेची रूग्णालये आहेत. परंतू, या मर्यादित वैद्यकीय सेवेद्वारे संपूर्ण जिल्ह्यास आरोग्य व्यवस्था पुरविण्यास अडचण निर्माण होत आहे. याचा विचार करून वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाच्या अधिपत्याखाली रत्नागिरी येथे १०० विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व त्यास संलग्नित जिल्हा सामान्य रूग्णालयाचे श्रेणीवर्धन करून ४३० रुग्णखाटांचे जिल्हा रुग्णालय स्थापन करण्याचा निर्णय युती सरकारने घेतला आहे.

Previous articleदेवरूखात माझा गणपती माझा मताधिकार देखावा ठरतोय कौतुकाचा विषय
Next articleउक्षी रेल्वे स्थानकावर दिवा-सावंतवाडी, तुतारी एक्स्प्रेस थांब्यासाठी ना.उदय सामंत यांची भेट
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here