Home Breaking News आदिवासी एकता मित्र मंडळ सहावा वर्धापन दिन साजरा.

आदिवासी एकता मित्र मंडळ सहावा वर्धापन दिन साजरा.

365

आदिवासी एकता मित्र मंडळ
सहावा वर्धापन दिन साजरा.

वैभव पाटिल विभागीय संपादक

आज 14 जुलै रोजी आदिवासी एकता मित्र मंडळाचा सहावा वर्धापन दिन मनोर तालुका पालघर येथे साजरा करण्यात आला.या वेळी प्रमुख वक्ते म्हणून श्री रवींद्रजी रहाळकर उपस्थित होते तसेच या प्रसंगी कोविड काळात उल्लेखनीय कार्य करणारे डॉक्टर अब्दुल रहेमान रईस (डॉ पप्पू रईस)यांचा विशेष सत्कार करण्यात आला व ग्रामपंचायत मनोर येथील स्वच्छता कर्मचारी यांचा सत्कार करण्यात आला तसेच आदिवासी एकता मित्र मंडळाचे मुख्य कार्यालय बिरसायत उभारण्यासाठी योगदान देणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करण्यात आला.या प्रसंगी मंडळाची पुढील एक वर्षासाठी कार्यकारी समितीची घोषणा करण्यात आली त्यात कार्यकारी अध्यक्ष म्हणून किसन *नारायण भूयाल, कार्यकारी उपाध्यक्ष दामोदर कासट , कार्यकारी सचिव म्हणून सचिन झाटे, यांची निवड करण्यात आली. संतोष जनाठे यांच्या हस्ते गाव/पाडा कमिटी यांचा सत्कार करण्यात आला.

Previous articleदेगलूर तालुक्यातील करडखेडचे तलाव एकाच पावसामुळे भरले १०० टक्के
Next articleमहाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता 10 वीचा ऑनलाईन निकाल उद्या
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.