Home Breaking News देगलूर तालुक्यातील करडखेडचे तलाव एकाच पावसामुळे भरले १०० टक्के

देगलूर तालुक्यातील करडखेडचे तलाव एकाच पावसामुळे भरले १०० टक्के

175

देगलूर तालुक्यातील करडखेडचे तलाव एकाच पावसामुळे भरले १०० टक्के

नांदेड प्रतिनिधी / राजेशNभांगे

नांदेड जिल्ह्यात मंगळवार १३ जुलै २०२१ रोजी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत गत २४ तासात सरासरी १९.६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून, जिल्ह्यात दिवसभरात एकूण १५६.३ मिलिमीटर पाऊस झाला आहे. देगलूर तालुक्यातील करडखेड तलावातून देगलूर येथे वॉटर सप्लाय असल्यामुळे देगलूर वासियांचा जीवन-मरणाचा पाण्याचा प्रश्न एकाच पावसामुळे पूर्ण तलाव भरल्यामुळे सध्यातरी मिटला आहे. गेल्या १५ ते २० दिवसापासून नांदेड जिल्ह्यात पावसाने तडी दिला होता. पण गेल्या चार दिवसापासून पावसाने दमदार हजेरी लावल्यामुळे बिलोली तालुक्यातील व देगलूर तालुक्यातील व सर्व नांदेड जिल्ह्यातील सर्व नदी, नाले, तलाव तुडुंब भरून वाहत आहेत. या पावसामुळे बळीराजा जगाचा पोशिंदा सध्यातरी सुखावलेला आहे.

Previous articleअजमिर सौन्दाणे ग्रामपंचायत वार्ड क्रमांक 3 चे सेवाभावी सदस्य व अतिशय गरीब परिस्थिती
Next articleआदिवासी एकता मित्र मंडळ सहावा वर्धापन दिन साजरा.
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.