Home नांदेड मुखेड तालुका डोंगरी घोषित करा पेंढारकर यांचे महसुलमंत्री थोरात यांच्याकडे साकडे

मुखेड तालुका डोंगरी घोषित करा पेंढारकर यांचे महसुलमंत्री थोरात यांच्याकडे साकडे

57
0

आशाताई बच्छाव

IMG-20220607-WA0019.jpg

मुखेड तालुका डोंगरी घोषित करा
पेंढारकर यांचे महसुलमंत्री थोरात यांच्याकडे साकडे

मंत्री अमित देशमुख यांनी केली शिफारस

मुखेड : संग्राम पाटील तांदळीकर

मुखेड तालुका बालाघाटच्या डोंगरांनी वेढलेला तालुका असुन या तालुका डोंंगराळ भाग असल्याने येथील बहुतांश नागरीक उपजिवेकीसाठी मोठया शहराकडे स्थलांतर करीत असतात. या भागात कोणताही मोठा प्रकल्प नाही, कारखाना नाही, एमआयडीसी नाही यामुळे मुखेड तालुका डोंगरी घोषित करावे असे पत्र वैद्यकिय शिक्षण व सांस्कृतिक मंत्री अमित देशमुख यांच्याकडे भाजप नेते गुरुनाथ पेंढारकर यांनी दिले असताना या पत्राला मंत्री अमित देशमुख यांनी महसुल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे शिफारस केली आहे.

यापत्रारुन पेंढारकर यांनी महसुलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे मुखेड तालुका डोंगरी घोषित करुन येथील गोर गरीब, वंचित नागरीक, विद्यार्थ्यांना न्याय दयावे अशी मागणी केल्याचे सांगितले.

मुखेड तालुका हा अविकसित व मागासलेला भाग म्हणुन परिचित असुन या भागात मोठे उत्पन्नाचे साधन नाही. तसेच डोंगराळ भाग असल्याने पावसाच्या पाण्यावर शेती अवलंबून आहे. स्थलांतराचे मोठे प्रमाण या तालुक्याला लागलेले ग्रहण आहे. येथील नागरीकांचा विकास करावयाचा असल्यास मुखेड तालुका डोंगरी भाग म्हणुन घोषित होणे तितकेच गरजेचे असल्याचे पत्रात पेंढारकर यांनी नमुद केले आहे.

चौकट…..

पेंढारकर यांनी यापुर्पी मुखेड तालुक्यात एम.आय.डी.सी. यावी यासाठी मा. राज्यपाल यांची भेट घेऊन पत्र दिले होते तर तालुक्यात सर्पदंश रुग्णालय व्हावे यासाठीही आरोग्यमंत्री यांना पत्रव्यवहार केला आहे. तालुक्यासातील विविध समस्या सरकारकडे मांडून तालुक्यातील परिस्थिती दर्शवण्याचा नेहमी प्रयत्न ते करत असतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here