Home गडचिरोली जिल्हयातील ग्रामपंचायतींना नियमित जी.एस. टी. भरण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी निर्देशित करावे आमदार डॉ...

जिल्हयातील ग्रामपंचायतींना नियमित जी.एस. टी. भरण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी निर्देशित करावे आमदार डॉ देवरावजी होळी

47
0

आशाताई बच्छाव

IMG-20220607-WA0020.jpg

जिल्हयातील ग्रामपंचायतींना नियमित जी.एस. टी. भरण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी निर्देशित करावे

आमदार डॉ देवरावजी होळी

ग्रामपंचायतींनी जीएसटी न भरल्याने कोट्यावधी रुपयांची कामे थकली

नियमित जी.एस.टी. न भरल्यास ग्रामपंचायतींना सरळ येणारा विकास फंड मिळण्यास येणार अडचणी

गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)

जिल्ह्यातील अधिकाधिक ग्रामपंचायतीनी जी.एस.टी. न भरल्यामुळे विकासात्मक कामासाठी येणारा निधी रोखून धरण्यात आला असून जोपर्यंत ग्रामपंचायती नियमित जीएसटी भरणार नाही तोपर्यंत त्यांना सदर कामे मिळणार नाहीत अशी शासनाची भूमिका असल्याने जिल्ह्यातील ग्रामपंचायतींना नियमीत जिएसटी भरण्यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी आदेशित करावे अशी मागणी आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी जिल्हाधिकारी गडचिरोली यांच्याकडे केली आहे.

जीएसटी न भरल्यामुळे ग्रामपंचायतींना १५ लाखाहून अधिक किंमतीची कामे देण्यास थांबविण्यात आले आहे .जोपर्यंत ग्रामपंचायती आपला नियमित जीएसटी भरणार नाही तोपर्यंत त्या पेक्षा अधिक रकमेची विकासात्मक कामे एकाच ग्रामपंचायतीला देण्यात येणार नाही. अशी कामे खुली निविदा प्रक्रिया राबवून करण्यात येतील त्यामुळे ग्रामपंचायतींना सरळ मिळणारा निधी उपलब्ध होणार नाही असे झाल्यास ग्रामपंचायतींचे मोठे नुकसान होऊन विकासात्मक कामे होण्यास अडचणी येतील. त्यामुळे जिल्ह्यातील ग्रामपंचायतीने आपला नियमित जिएसटी भरावा यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित ग्रामपंचायतींना निर्देशित करावे अशी मागणी आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here