Home अमरावती मोर्शी वरूड उपजिल्हा रुग्णालयात निर्माण होणार नवीन ट्रॉमा केअर युनिट !

मोर्शी वरूड उपजिल्हा रुग्णालयात निर्माण होणार नवीन ट्रॉमा केअर युनिट !

21
0

आशाताई बच्छाव

IMG_20240305_195511.jpg

मोर्शी वरूड उपजिल्हा रुग्णालयात निर्माण होणार नवीन ट्रॉमा केअर युनिट !

मोर्शी वरूड तालुक्यात निर्माण होणार भक्कम आरोग्य सुविधा — आमदार देवेंद्र भुयार

विवीध ठिकाणी नवीन प्राथमिक आरोग्य केंद्रासह प्राथमिक आरोग्य केंद्राचे श्रेणीवर्धन !

गजानन जिरापुरे
चीफ ब्युरो अमरावती
मोर्शी वरूड तालुक्यातील ग्रामीण भागातील नागरिकांना चांगल्या आरोग्य सुविधा मिळाव्यात यासाठी आमदार देवेंद्र भुयार यांनी आरोग्य यंत्रणा प्राधान्याने निर्माण करण्यासाठी पुढाकार घेतला असल्यामुळे मोर्शी वरूड तालुक्यातील
वरुड,मोर्शी तालुक्यातील जनतेसाठी नवीन रुग्णालय करण्यासाठी अजितदादा पवार उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री यांच्याकडे विशेष पाठपुरावा करून आमदार देवेंद्र भुयार यांनी वरूड येथे १०० बेड महिला व बाल रुग्णालय, वरूड येथील ५० बेड उपजिल्हा रुग्णालयाचे १०० बेड मध्ये श्रेणीवर्धन करने. जरूड येथे नवीन प्राथमिक आरोग्य केंद्र. लोणी येथे ५० बेड चे ग्रामीण रुग्णालय. मोर्शी येथे १०० बेड चे ट्रामा केयर. खेड येथे ३० बेड चे ग्रामीण रुग्णालय, रिद्धपुर येथे नवीन प्राथमिक आरोग्य केंद्र, पिंपळखुंटा मोठा येथे नवीन प्राथमिक आरोग्य केंद्र वरुड उपजिल्हा रुग्णालय येथे आरोग्य कर्मचारी निवासस्थान मोर्शी उपजिल्हा रुग्णालय येथे आरोग्य कर्मचारी निवासस्थान बांधकाम कारणे यासह आदी विकासकामे मंजूर करून आणली.
मोर्शी वरूड तालुक्यात मोठ्या प्रमाणात आरोग्य सेवा निर्माण करण्यात येत आहे. कोविड संकट काळात आरोग्य यंत्रणेचे महत्व आपल्याला समजले आहे. त्यामुळे आरोग्य सुविधांच्या विकासासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, असा विश्वासही आमदार देवेंद्र भुयार यांना उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी दिला.
आमदार देवेंद्र भुयार यांच्या माध्यमातून नवीन उपकेंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालये मंजूर करण्याची मागणी केल्यामुळे अस्तित्वात असलेल्या शासकीय रुग्णालयांमध्ये खाटांची संख्या वाढवून त्यांचे श्रेणीवर्धन करण्याची मागणी केली होती. आमदार देवेंद्र भुयार यांच्या मागणीची दखल घेऊन उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी मोर्शी वरूड तालुक्यातील विविध नवीन उपकेंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्र, रुग्णालय यांना मान्यता दिली मिळऊन दिली त्याबद्दल मोर्शी वरूड तालुक्यातील नागरिकांनी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, आमदार देवेंद्र भुयार यांचे आभार मानले.
उपजिल्हा रुग्णालय मोर्शी, वरूड येथे नवीन ट्रॉमा केअर युनिट, वरुड, मोर्शी, तालुक्यातील नवीन प्राथमिक तसेच उप आरोग्य केंद्रे, उप जिल्हा रुग्णालयांना मंजुरी देण्याबरोबरच, रुग्णालयांचे श्रेणीवर्धन, पदभरतीची प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्यात येणार आहे. रुग्णालयांना वैद्यकीय चाचणी आणि अद्ययावत उपचार यंत्रणा उपलब्ध करावी. औषधांचा पुरवठा नियमित सुरु राहील, याची दक्षता घेऊन रुग्णांची कुठलीही गैरसोय होणार नाही याची संबंधित आरोग्य अधिकाऱ्यांनी दक्षता घ्यावी, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले असल्याची माहिती आमदार देवेंद्र भुयार यांनी दिली.

Previous articleफार्मसी च्या अमरावती येथे विद्यार्थ्यांचा छत्रीतला मृत्यू: छत्रीतलावर मित्र, मैत्रिणीसह गेला होता सहलीसाठी.
Next articleकष्ट जिद्दीच्या जोरावर डॉ.अक्षता रेणुसे पशुवैद्यकीय अधिकारी पदी निवड
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here