Home कोल्हापूर कष्ट जिद्दीच्या जोरावर डॉ.अक्षता रेणुसे पशुवैद्यकीय अधिकारी पदी निवड

कष्ट जिद्दीच्या जोरावर डॉ.अक्षता रेणुसे पशुवैद्यकीय अधिकारी पदी निवड

262

आशाताई बच्छाव

IMG_20240305_195803.jpg

कष्ट जिद्दीच्या जोरावर डॉ.अक्षता रेणुसे पशुवैद्यकीय अधिकारी पदी निवड

पेठवडगांव राहुल शिंदे: दृढनिश्चय कष्ट आणि जिद्दीच्या जोरावर डॉ.अक्षता पतंगराव रेणुसे राज्य शासनाच्या पशुधन विकास अधिकारी महाराष्ट्र पशुधन सेवा (गट अ)राज्य सेवा आयोगाच्या सरळ सेवा भरती मधून निवड झाली.डॉ.अक्षता या वडगांव पोलीस ठाण्याचे कर्तव्य दक्ष पोलीस हेड कॉन्स्टेबल पतंगराव रेणुसे यांच्या कन्या आहेत.डॉ.अक्षता यांनी आई वडिलांचे स्वप्न साकारले. डॉ.रेणुसे यांचे प्राथमिक शिक्षण प्रिन्स पद्मराजे गर्ल हायस्कूल कोल्हापूर,तर माध्यमिक गोखले कॉलेज कोल्हापूर,तर उदगीर (लातूर)येथे महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले.कष्ट आणि जिद्दीच्या जोरावर अक्षता रेणुसे यांनी पहिल्याच प्रयत्नात यश संपादन केले.
रेणुसेवाडी छोट्याशा खेडेगावात राहणाऱ्या एकत्र कुटुंब पद्धतीत राहत असलेल्या संपूर्ण शेतकरी कुटुंबाचे पार्श्वभूमी असलेल्या डॉ.अक्षता रेणुसे यांचे यश ग्रामीण भागातील युवक युवतींना प्रेरित करेल.

Previous articleमोर्शी वरूड उपजिल्हा रुग्णालयात निर्माण होणार नवीन ट्रॉमा केअर युनिट !
Next articleआमचा लढा हा भाजपच्या विरोधात आहे : वंचितचे नेते एडवोकेट बाळासाहेब आंबेडकर
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.