Home भंडारा साकोली विधानसभा बहुजन समाज पार्टीची बैठक संपन्न

साकोली विधानसभा बहुजन समाज पार्टीची बैठक संपन्न

134

आशाताई बच्छाव

IMG_20231221_044859.jpg

साकोली विधानसभा बहुजन समाज पार्टीची बैठक संपन्न

संजीव भांबोरे
भंडार( जिल्हा प्रतिनिधी) बहुजन समाज पार्टी साकोली विधानसभेच्या वतीने दिनांक १९/१२/२०२३ ला विश्राम भवन साकोली येथे कार्यकर्ता बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत बहन मायावतीजी यांचा जन्मदिन जनकल्याणकारी दिवस म्हणुन प्रत्येक विधानसभामध्ये साजरा करणे आणि गाव तिथे कार्यकर्ता निर्माण करणे गावागावात जाऊन नुक्कड़ सभा घेणे ,यांनतर बंद खोली मधिल कार्यक्रम कमी करुण जास्तीजास्त जाहिर कार्यक्रम घेवु व नुकत्याच झालेल्या चार राज्याचा विधानसभा निवडणुका मध्ये बसपा च्या प्रदर्शना वर चर्चा, साकोली विधानसभा मध्ये कॉडर चे आयोजन करण्या बाबद व लवकरात लवकर सेक्टर बुथ तयार करून बहुजन समाज पार्टी लोकसभा , विधानसभा ,नगर परिषद निवडणुका ताकतीने लढवु अशी चर्चा बैठकी मध्ये करण्यात आली.
या बैठकीमध्ये मान्यवरानी मार्गदर्शन केले .
प्रमुख मार्गदर्शक म्हणून भंडारा जिल्हाध्यक्ष – पाम्बिर्दजी मोटघरे यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते.
तर प्रमुख अतिथि म्हणून
सोपान दिवठे जिल्हा सचिव बसपा, विक्रांत भावसागर जिल्हा सयोजक बामसेफ,धिरज गोस्वामी जिल्हा सचिव,
स्वपनिल बिट्टू गजभिये विधानसभा अध्यक्ष ,
विलास नरूले उपाध्यक्ष विधानसभा, कार्तिक मेश्राम कोषाध्यक्ष विधानसभा, छोटेलाल गेडाम माहासचिव विधानसभा, मनोज दादा कोटांगले विधानसभा सचिव, नितिन रामटेके, नितिन मेश्राम माझी विधानसभा अध्यक्ष, भावेश कोटांगले,भानक खोबरागडे, विनायक दहीवले,केवळराम राऊत विधानसभा सचिव, देवेंद्र मेश्राम विलास मेश्राम जाभंडी, विजय साखरे, चोपराम लांडगे, गोवर्धन मेश्राम ,सर विलास रामटेके, अनिकेत खांडेकर, मोरेश्वर नंदेश्वर,शरद बडोले , विलास रामटेके यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन साकोली विधानसभा यांनी केले तर आभार
साकोली विधानसभेचे सचिव मनोज दादा कोटांगले यांनी मानले.