Home अमरावती अमरावती जिल्ह्यात बोचरी थंडी रब्बीतील पिकासाठी लाभदायक, सर्वात कमी ११ अंश तापमानाची...

अमरावती जिल्ह्यात बोचरी थंडी रब्बीतील पिकासाठी लाभदायक, सर्वात कमी ११ अंश तापमानाची नोंद.

30
0

आशाताई बच्छाव

IMG_20231221_045227.jpg

अमरावती जिल्ह्यात बोचरी थंडी रब्बीतील पिकासाठी लाभदायक, सर्वात कमी ११ अंश तापमानाची नोंद.
———–
दैनिक युवा मराठा.
पी एन देशमुख.
अमरावती जिल्हा विभागीय संपादक.
अमरावती.
अमरावती जिल्ह्यात मागील चार ते पाच दिवसापासून शहरासह जिल्ह्यात हुडहुडी भरवणारी थंडी सुरू आहे. आज सोमवारी दुपारी रात्री गारठा अधिक वाढला. दरम्यान मंगळवारी पहाटे तर दुसऱ्या थंडीचा अनुभव शहरात येत होता. या हंगामातील सर्वात कमी ११ अंश तापमान मंगळवारी (दी.१९) पहाटे येथील जलविज्ञान प्रकल्प नोंद झाली आहे. मागील आठवड्यापासून किमान व कमाल अशा दोन्ही तापमानात घट आली आहे. मागील आठवड्यात दोन दिवस पारा १२.५ अशा पर्यंत खाली घसरला होता. मात्र मंगळवारी तर पारा ११ अंशावर आला होता. त्यामुळे दिवसभर गारठा जाणवत होता. आणखीन काही दिवस अमरावतीकरांना अशा बोचऱ्या थंडीचा सामना करावा लागणार असल्याचे हवामान तज्ञांनी सांगितले आहे. हिमालया सुरू असलेले हिमव्रुष्टी तसेच उत्तरेकडून वाहत येणारे थंडे वारे आणि मध्य प्रदेशातील थंडीची लाट या सर्व कारणामुळे सध्या अमरावती जिल्ह्यात बोचऱ्या थंडीचा अनुभव येत आहे. या बोचऱ्या थंडीमुळे रब्बीच्या पिकांना लाभ होणार आहे. एक पाहिजे कारण थंडी असली तरीही सध्या स्थिती धोके नाही. वातावरण ढगळ नाही. त्यामुळे पिकांना ही थंडी फायदेशीर आहे, अशी माहिती कृषी हवामान तज्ञांनी दिली आयुष्याखाली गेल्यास पिकांची काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे असेही त्यांनी सांगितले. सध्या असलेली थंडी गहू, हरभरा तसेच इतर रब्बी पिकासाठी फायद्याची आहे. मात्र तापमान १० अंशाखाली गेल्यास पिकांना थोड्या प्रमाणात रात्रीच्या वेळी सिंचन करणे आवश्यक आहे. त्याचा फायदा पिकांना होईल असे डॉक्टर सचिन मुंडे कृषी हवामान शास्त्रज्ञ अमरावती यांनी माहिती दिली.

Previous articleसाकोली विधानसभा बहुजन समाज पार्टीची बैठक संपन्न
Next articleचाळीसगावात घरातून सव्वा चार लाखांचा ऐवज लंपास
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here