Home माझं गाव माझं गा-हाणं भव्य सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा मालेगाव

भव्य सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा मालेगाव

223
0

राजेंद्र पाटील राऊत

भव्य सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा मालेगाव
प्रतिनिधी /सतिश घेवरे मालेगांव युवा मराठा न्युज नेटवर्क
मालेगांव मा.ना.श्री.दादाजी भुसे कृषीमंत्री, महाराष्ट्र राज्य यांच्या मार्गदर्शनाने या आधीही सामुदायिक विवाह सोहळे आयोजित केले आहे. या वर्षी कोरोनामुळे मध्यम वर्गीयांना आर्थिक तुटवडा निर्माण झाल्याने त्यांना विवाह सोहळे पार पाडण्यास आर्थिक समस्या येत आहे.

यावर ना.दादाजी भुसे यांनी तोडगा म्हणून हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे कन्यादान योजनेअंतर्गत, यंदाही इच्छुकांसाठी दि.26 एप्रिल 2021 रोजी सोहळ्याचे आयोजन करण्याचा निर्णय घेतला आहे. याअंतर्गत जर आपल्या कुटूंबामध्ये आपल्या पाल्याचा विवाह जमला असेल तर त्यांनी शिवसेना संपर्क कार्यालय मालेगांव येथे संपर्क साधून नोंदणी करावी. मालेगांव तालुक्यातील कोणीही इच्छुक व्यक्ती या सर्वधर्मीय सोहळ्यात सहभागी होऊ शकतात.

अनुसूचित जाती (नवबौद्धांसह) विमुक्त जाती, भटक्या जमाती (धनगर व वंजारीसह) विशेष मागास प्रवर्गातील आर्थिक कमकुवत असलेल्या मागासवर्गीय कुटुंबातील सामुहिक विवाह सोहळ्यामध्ये सहभागी होणाऱ्या जोडप्यास एकूण रु.20,000/-(मणीमंगळसूत्र व संसारोपयोगी साहित्य यासाठी) इतकी रक्कम तर आदिवासी बांधवांसाठी एकूण रु.10,000/-इतकी रक्कम वधूचे वडील, आई किंवा पालकांच्या अधोरेखित धनादेशाद्वारे (क्रॉस चेकने) लग्नाच्या दिवशी देण्यात येईल.

वधू व वर यांच्या प्रथम विवाहासाठीच अनुज्ञेय असेल. तसेच सदरील योजनेचा लाभ विधवा महिलेस दुसऱ्या लग्नाकरिता देखील अनुज्ञेय राहील.

Previous articleदादासाहेबांच्या साथीने मालेगांव विकासाच्या दिशेने
Next articleहिप्परगा रवा ता लोहारा ‘राष्ट्रीय शाळे’च्या शताब्दीनिमित्त
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here