• Home
  • दादासाहेबांच्या साथीने मालेगांव विकासाच्या दिशेने

दादासाहेबांच्या साथीने मालेगांव विकासाच्या दिशेने

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20210214-WA0003.jpg

दादासाहेबांच्या साथीने
मालेगांव विकासाच्या दिशेने
मालेगाव /प्रतिनिधी सतिश घेवरे युवा मराठा न्युज नेटवर्क
मा. ना. दादाजी भुसे साहेब (कृषिमंत्री, महाराष्ट्र राज्य) यांच्या विशेष प्रयत्नातून प्रभाग क्र ११ कलेक्टर पट्टा ,आयोध्या नगर या भागाच्या मूलभूत विकासासाठी २ कोटी ३० लक्ष रुपयांच्या विकास कामांचे भूमिपूजन आज मा दादाजी भुसे साहेबांच्या शुभ हस्ते अयोध्या नगर येथे संपन्न झाले.

प्रभाग क्र ११ चा सर्वांगीण विकास व्हावा याकरीता मा भुसे साहेबांनी या भागासाठी रस्ते, गटार, सभामंडप, अभ्यासिका , उद्यान ह्या सर्व कामांकरिता २ कोटी ३० लक्ष रुपये एवढा निधी नगरविकास विभाग व महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने साहेबांनी विशेष प्रयत्न करून उपलब्ध करून दिला.

यावेळी बोलतांना मंत्री महोदय श्री.भुसे म्हणालेत, मालेगाव शहराच्या विकासासाठी नगर विकास विभाग ५ कोटी व मालेगाव महानगर पालिका ५ कोटी आशा ऐकून १० कोटी रुपयांचा विकास निधींच्या कामांचा आज शहरात ठीक ठिकाणी शुभारंभ होत आहे. त्याचबरोबर येणाऱ्या प्रत्येक महिन्याला नवनवीन विकास कामांचा शुभारंभ होत राहील.

प्रभाग क्र ११ च्या विकासासाठी २ कोटी ३० लक्ष रुपयांचा मोठा निधी दिला त्याबद्दल नगरसेविका तथा सभापती सौ कल्पना विनोद वाघ यांनी दादाजी भुसे साहेबांचे यावेळी विशेष आभार मानलेत.

याप्रसंगी, उपमहापौर निलेश आहेर,जेष्ठ शिवसैनिक मनोहर बच्छाव,युवासेना जिल्हा प्रमुख विनोद वाघ, जयराजजी बच्छाव,ताराचंद बच्छाव,उपशहर प्रमुख राजू अलिझाड, यशपाल बागुल,दत्ता चौधरी,प्रमोद पाटील भारतभाऊ बेद ,शरदजी पाटील,शाखाप्रमुख सुनील अहिरे, तात्या महाले,मोहन पाटील, उपस्थित होते.

anews Banner

Leave A Comment