• Home
  • हिप्परगा रवा ता लोहारा ‘राष्ट्रीय शाळे’च्या शताब्दीनिमित्त

हिप्परगा रवा ता लोहारा ‘राष्ट्रीय शाळे’च्या शताब्दीनिमित्त

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20210214-WA0014.jpg

उस्मानाबाद १४ फेब्रुवारी⭕ युवा मराठा न्यूज प्रतिनिधी सिद्धांत चौधरी
हिप्परगा रवा ता लोहारा
‘राष्ट्रीय शाळे’च्या शताब्दीनिमित्त
१९२१. तुळजापूर तालुक्यातील हिप्परगा या सातशे वस्तीच्या चिमुकल्या गावात व्यंकटराव देशमुख व त्यांचे बंधू अनंतराव यांनी ‘राष्ट्रीय शाळे’चा प्रारंभ केला. या शाळेने हैदराबाद सरकारने निश्चित केलेला अभ्यासक्रम नाकारून इंग्रजी शासनाने मान्य केलेला व राष्ट्रीय महाविद्यालयात शिकवला जाणारा अभ्यासक्रमस्वीकारला होता. गावालगतच्या दोन एकरांच्या प्रशस्त जागेतील ऐंशी खण असलेल्या इमारतीत दिवसा शाळा भरे आणि रात्री तिचा वसतीगृह म्हणून उपयोग होई. शाळेत १५० मुले होती. त्यांना जातपात न मानता एकत्र राहण्या-जेवण्याची अट होती.
या शाळेत मानवेंद्रनाथ रॉय यांचे सहकारी के.के.देशपांडे, पुढे ‘लोकसत्ता ‘चे संपादक झालेले ह.रा. महाजनी, मुक्तीसंग्रामाचे सेनानी व्यंकटेश खेडगीकर उर्फ स्वामी रामानंदतीर्थ, रा.गो. उर्फ बाबासाहेब परांजपे असे शिक्षक होते.
त्यावेळी हैदराबादची ’ विवेकवर्धिनी’, गुलबर्ग्याची ‘नूतन विद्यालय’ , औरंगाबदेतील’ सरस्वती भुवन/ व शारदा मन्दिर’ परभणीची ‘नूतन विद्यालय’ एवढ्याच शाळा हैदराबाद संस्थानात होत्या.
(माजी न्यायमूर्ती. श्री. नरेंद्र चपळगावकर यांच्या’ कर्मयोगी संन्यासी’ मधून)
मागे वळून पाहता, ‘राष्ट्रीय शाळे’ने हैदराबाद मुक्तीसंग्रामाचा पाया घातला. त्याचबरोबर शिक्षण व समाजसुधारणेचीही बीजे रोवली. त्यामुळे आजचा मराठवाडा दिसत आहे. म्हणून त्यांच्याविषयी कृतज्ञता वाटते.
प्रश्न आपला आहे, पुढील पिढ्यांनी आपल्याला आठवावे असं काही आपण करत आहोत का त्यांच्या हाती दुष्काळी, हवामान बदलाने पिडलेला, पाणी (व निसर्ग ) आटलेला, बौद्धिक,आर्थिक व शारीरिक संपदा निघून जाणारा विभाग सोपवणार आहोत, याचा विचार ‘राष्ट्रीय शाळे’च्या शताब्दीनिमित्त करावा का ?

anews Banner

Leave A Comment