आशाताई बच्छाव
श्री क्षेत्र वनसगावला आज संत वृंदाच्या उपस्थितीत धर्म ध्वजारोहण सोहळा–
वैराग्यमूर्ती तुकाराम बाबा जेऊरकर यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण संपन्न होणार
दैनिक युवा मराठा
निफाड नाशिक प्रतिनिधी रामभाऊ आवारे
श्री क्षेत्र वनसगाव तालुका निफाड येथे वै प पु भागवत बाबा शिंदे खडक माळेगावकर व वै प पु संतदास बाबासाहेब काका शिंदे यांच्या शुभ प्रेरणेने
खंडेराव महाराज मंदिर प्रांगणात आज दुपारी तीन वाजता वैराग्य मुर्ती हभप तुकाराम बाबा जेऊरकर यांच्या शुभहस्ते व संत मांदियाळी च्या प्रमुख उपस्थितीत संत तुकाराम बीज व शांती ब्रह्म एकनाथ महाराज षष्ठी, शासकीय तिथीप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज जयंती व धर्मवीर संभाजी राजे बलिदान दिनाचे औचित साधत २६ मार्च ते २ एप्रिल दरम्यान होत असलेल्या सुवर्ण महोत्सवी अखंड हरिनाम सप्ताहाच्या कार्यक्रमासाठी ध्वजपूजन व ध्वजारोहण सोहळा संपन्न होणार असल्याची माहिती सप्ताह समितीचे प्रसिद्धीप्रमुख पत्रकार रामभाऊ आवारे यांनी दिली आहे.
दुपारी वेदशास्त्र पारंगत प्रशांत गव्हाले गुरुजी खेडे यांच्या वेद मंत्रोच्चारात सोमवार ११ मार्च रोजी दुपारी ३ वाजता जेष्ठ वारकरी मुरलीधर बहिरुनाथ शिंदे व सौ सरलाताई मुरलीधर शिंदे, अशोकराव महिफतराव डुंबरे व सौ निर्मला अशोक डुंबरे, रतनसेठ गोटीराम व्यवहारे व सौ शोभा रतनसेठ व्यवहारे, विश्वनाथ शंकर कापडी व सौ जयश्री विश्वनाथ कापडी तसेच अशोक निवृत्ती जाधव व
सौ कविता अशोक जाधव या प्रमुख सापत्नीक जोडीच्या शुभहस्ते ध्वज पूजन होणार आहे.
याप्रसंगी विश्वनाथ शिवालय मंदिरापासून टाळ मृदंगाच्या गजरात पायी दिंडी निघणार असून या दिंडीत महिलांनी त्या मार्गावर सडा समार्जन करुन ध्वज भोवती रांगोळी सजावट करून कार्यक्रमाची शोभा वाढवावी.तुलसी वृंदावन व कलश घेऊन युवती व महिलांनी स्वयंस्फूर्तीने उपस्थित राहुन दिंडीत सहभागी व्हावे तसेच ध्वजारोहण सोहळ्यासाठी समस्त ग्रामस्थ, सुवर्ण महोत्सवी अखंड हरिनाम सप्ताहातील विविध समिती सदस्य तसेच समस्त भजनी मंडळ आदींनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आव्हान सप्ताह कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे.
ध्वज पूजन व धर्म ध्वजारोहणासाठी पुढील मान्यवर उपस्थित राहणार
धर्माचार्य ह भ प निवृत्ती महाराज रायते खडक माळेगाव नाशिक जिल्हा अध्यक्ष अखिल भारतीय वारकरी मंडळ,
रामायणाचार्य ह भ प भास्कर नाना रसाळ आहेरगाव नाशिक विभागीय अध्यक्ष अखिल भारतीय वारकरी मंडळ, वारकरी भूषण ह भ प समाधान माऊली पगार आळंदी,धर्माचार्य हभप निवृत्ती महाराज चव्हाण ठाणगाव उपाध्यक्ष अखिल भारतीय वारकरी मंडळ, हभप बाळासाहेब महाराज शिरसाठ सह जिल्हाध्यक्ष अखिल भारतीय वारकरी मंडळ, ह भ प विठ्ठल अण्णा शेलार येवला तालुका अध्यक्ष महाराष्ट्र वारकरी महामंडळ, हभप दत्तात्रय पाटील डुकरे सरपंच तथा जिल्हा कार्याध्यक्ष वारकरी महामंडळ, हभप शंकरराव कोल्हे विभागीय अध्यक्ष वारकरी महामंडळ, ह भ प निलेश महाराज पवार लासलगाव, मा सभापती शिवा पाटील सुरासे निफाड, भागवताचार्य हभप सौ कल्याणी ताई निकम थेटाळे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.






