Home नांदेड ग्राम पंचायत जाहूर ता. मुखेड सरपंच पदी ओबीसी महिला, सुनंदा दामेकर यांची...

ग्राम पंचायत जाहूर ता. मुखेड सरपंच पदी ओबीसी महिला, सुनंदा दामेकर यांची निवड

209
0

राजेंद्र पाटील राऊत

ग्राम पंचायत जाहूर ता. मुखेड सरपंच पदी ओबीसी महिला, सुनंदा दामेकर यांची निवड

राजेश एन भांगे/ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क नांदेड 

आज दि. १४ फेब्रु. २०२१ रोजी शनि. दुपारी २.३० वा.सुमारास सौ. सुनंदा भारतराव दामेकर यांची दुसऱ्यांदा सरपंच म्हणून तर उपसरपंचपदी श्री दुर्योधन शिवाजीराव पाटील बोडके यांची बहुमताने निवड करण्यात आली.

त्याप्रसंगी त्यांचा ग्रामपंचायत सदस्या सौ. राधाबाई देविदासराव बोडके यांच्या शुभहस्ते शाल, श्रीफळ व पुष्पहाराने सत्कार करण्यात आला. तर श्री दुर्योधन शिवाजीराव पाटील बोडके यांचा श्री भारतराव केशवराव दामेकर यांच्या शुभ हस्ते सत्कार करण्यात आला. पॅनल प्रमुख तथा भारतीय जनता पक्षाचे माजी तालुका अध्यक्ष श्री नामदेवराव पाटील हिवराळे जाहूरकर यांचा श्री प्रकाशराव केशवराव दामेकर यांनी शाल, श्रीफळ व पुष्पहाराने सत्कार करण्यात आला.
तरी या निवडी बद्दल माजी आमदार भाई गुरूनाथराव कुरुडे साहेब कंधार, नंदकुमार सेठ शाखावार देगलूर , उल्हास मेमोरियल ट्रस्ट चे अध्यक्ष भाई दत्तात्रय कुरुडे, राष्ट्रवादीचे नांदेड जिल्हा उपाध्यक्ष श्री लक्ष्मीकांत सेठ पदमवार, अविनाश नीलामवर,अखिल भारतीय ओबीसी महा संघाचे विभागीय अध्यक्ष व युवा मराठा व्रत पत्राचे नांदेड जिल्हा ब्यूरो चीफ राजेश एन भांगे व संजय कद्रेकर यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here