• Home
  • भूमिहीन दिव्यांग,शेतमजूर, गायराणपट्टेधारक शेतकर्‍यांनी शासकीय जमीन मिळण्यासाठी जमीन हक्क परिषद किनवट दि २१ फेब्रु २१ ला हजारोच्या संख्येने सहभागी व्हावे. चंपतराव डाकोरे पाटिल कुंचेलिकर यांनी माहूर मेळाव्यात केले आवाहन….

भूमिहीन दिव्यांग,शेतमजूर, गायराणपट्टेधारक शेतकर्‍यांनी शासकीय जमीन मिळण्यासाठी जमीन हक्क परिषद किनवट दि २१ फेब्रु २१ ला हजारोच्या संख्येने सहभागी व्हावे. चंपतराव डाकोरे पाटिल कुंचेलिकर यांनी माहूर मेळाव्यात केले आवाहन….

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20210213-WA0077.jpg

भूमिहीन दिव्यांग,शेतमजूर, गायराणपट्टेधारक शेतकर्‍यांनी शासकीय जमीन मिळण्यासाठी जमीन हक्क परिषद किनवट दि २१ फेब्रु २१ ला हजारोच्या संख्येने सहभागी व्हावे. चंपतराव डाकोरे पाटिल कुंचेलिकर यांनी माहूर मेळाव्यात केले आवाहन….
मुखेड तालुका प्रतिनिधी मनोज बिरादार (युवा मराठा न्युज नेटवर्क)
माहूर तालुक्यातील कपिलेश्वर धर्मशाळा किनवट येथे दिव्यांग वृध्द निराधार मिञ मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुंचेलीकर यांच्या अध्यक्षतेखाली भूमिहीन दिव्यांग,शेतमजूर, गायराणपट्टे धारकांच्या माहूर येथे मेळावा संपन्न झाला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख पाहुणे यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.जील्हा ऊपध्यक्ष राजुभाऊ शेरकुरवार यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.
प्रस्ताविक दिव्यांग संघटनेचे ता. अध्यक्ष प्रेमसिंग चव्हाण यांनी केले .दिव्यांग संघटनेचे संस्थापक चंपतराव डाकोरे पाटिल यांनी दिव्याग बाधवानी संघटितपणे नांदेड जिल्ह्यात शासन प्रशासन यांना जागे करण्यासाठी ७८ सनदशीर आंदोलन केल्यामुळे आज दिव्यांग बांधवाना गाव पातळीवर दिव्यांग निधी, घरकुल ईतर सवलती मिळत आहेत
आता दिव्यांगाना शासकीय जमीन व सर्व सवलती मिळण्यासाठी गाव तिथ दिव्यांग संघटनेच्या बोर्डाचे शाखा स्थापन करून आपली संघटित शक्ती दाखऊन संघटितपणे संघर्ष केल्याशि़वाय न्याय मिळत नसल्यामुळे दिव्यांगानीआपली संघटित शक्ती दाखविण्यासाठी संघर्षात सामिल होऊन आपला हक्क मिळवून घेण्यासाठी सर्व प्रकारच्या दिव्यांग बांधवांनी संघटितपणे संघर्ष करून दिव्यांगाना शासकिय जमीन मिळावी म्हणून जमीन हक्क परिषद किनवट येथे हजाराच्या संख्येने, सहभागी व्हावे असे आव्हान प्रेमसिग चव्हाण यांनी केले.
दिव्यांग संघटनेचे जिल्हाऊप अध्यक्ष राजुभाऊ शेरकुरवार यांनी सर्व माझ्या लाडक्या मिञानी माझा माहूर आणि मांडवी मेळाव्यात माझा वाढदिवस मोठ्या उत्साहाने साजरा करून मला शुभेच्छा दिल्या असा आनंदाचा क्षण मला कायम आठवणीत राहिल मी आपला सर्वाचा श्रनी राहिल दिव्यांग मेळाव्याचा उद्देश व दिव्यांग बांधवांच्या अडचणीत संघटनेने शासन स्तरावरून प्रश्ननाची सोडवणूक करीत आहे त्यासाठी आपले सहकार्य महत्त्वाचे असल्यामुळे सर्वानी जमीन हक्क परिषद किनवट येथे उपस्थित राहाण्याचे अव्हाहण केले.
संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल यांनी दिव्यांगाना कोणीही धार देत नसल्यामुळे शासनाने जंगल जमीन, गायरान जमीन, मसुुरा जमीन, परमपुक जमीन, सिलिंग जमिन भूमिहीन दिव्यांग,शेतमजूर, गायराण पट्टेधारक बांधवांच्या नावावर दिले तर त्या दिव्यांगाना मान सन्मान व सर्व सामान्य जनतेसाठी त्यांना सन्मानाने त्यांच्या कुटुंबातील सदस्य त्यांना जगवतील व शासनास महसुल जमा होऊन शासनाच्या तिजोरीत वाढ होईल म्हणून अखिल भारतीय किसान मजदूर सभा व आदिवासी हक्क संघर्ष समिती, दिव्यांग वृध्द निराधार मिञ मंडळ महाराष्ट्र यांच्या संयुक्त कृति समितीने आयोजित आदिवासी जंगल अधिकार व जमिन हक्क परिषद २१ फ्रेबु २१ ला किनवट येथे गजानन मंदिर किनवट आयोजित करण्यात आला आहे हजारो आदिवासी, गायरान पट्टे धारक, दिव्यांग बांधवानी हजारोच्या संख्येची उपस्थित राहून संघटितपणे संघर्ष करण्यासाठी सहभागी व्हावे.
आपला हक्कासाठी सहभागी
होण्याचे आव्हान चंपतराव डाकोरे पाटिल यांनी केले.व माहूर ता कार्यकरणी करण्यात आली
माहुर ता अध्यक्षपदी प्रेमसिंग चव्हाण यांची फेरनिवड करण्यात आली ता ऊपअध्यक्ष
या मेळाव्यास प्रमुख पाहुणे जिल्हा उपअध्यक्ष राजुभाऊ शेरकुरवार, माहुर ता. अध्यक्ष प्रेमसिंग चव्हाण,
ईत्यादी शेकडो दिव्यांग वृध्द निराधार ,कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

anews Banner

Leave A Comment