Home विदर्भ मुख्यमंत्री महाआरोग्य कौशल्य विकास प्रशिक्षण जिल्हाधिकारी पवनीत कौर यांच्या उपस्थितीत रेडिएंट रुग्णालयात...

मुख्यमंत्री महाआरोग्य कौशल्य विकास प्रशिक्षण जिल्हाधिकारी पवनीत कौर यांच्या उपस्थितीत रेडिएंट रुग्णालयात दोन अभ्यासक्रमांचा शुभारंभ

168
0

राजेंद्र पाटील राऊत

मुख्यमंत्री महाआरोग्य कौशल्य विकास प्रशिक्षण
जिल्हाधिकारी पवनीत कौर यांच्या उपस्थितीत रेडिएंट रुग्णालयात दोन अभ्यासक्रमांचा शुभारंभ

अमरावती: ( ब्युरो टिम युवा मराठा न्युज नेटवर्क)- मुख्यमंत्री  महाआरोग्य कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रमात येथील रेडिएंट रूग्णालयात ‘सॅनिटरी हेल्थ एड’ व ‘सेंट्रल स्टेराईल सर्विस डिपार्टमेंट असिस्टंट’ या दोन अभ्यासक्रमांचा शुभारंभ जिल्हाधिकारी पवनीत कौर यांच्या उपस्थितीत आज झाला.

कोविड -19 साथीच्या पार्श्वभूमीवर वैद्यकीय क्षेत्रामध्ये कुशल मनुष्यबळ निर्माण करण्यासाठी ‘मुख्यमंत्री महाआरोग्य कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम’ राबविण्यात येत आहे. त्याअंतर्गत रेडिएंट रुग्णालयात सुरू झालेल्या प्रशिक्षणाअंतर्गत 20 प्रशिक्षणार्थी सहभागी झाले आहेत. या सर्वांचे जिल्हाधिका-यांच्या हस्ते ‘वेलकम कीट’ देऊन स्वागत करण्यात आले. सहायक रोजगार आयुक्त प्रफुल्ल शेळके, डॉ. सीमा अडवाणी, डॉ. माधुरी अग्रवाल, रोजगार मार्गदर्शन अधिकारी वैशाली पवार आदी यावेळी उपस्थित होते.

या उपक्रमातून रुग्णालयांना प्रशिक्षित मनुष्यबळ उपलब्ध होणार आहे. प्रशिक्षणार्थ्यांना आरोग्य सेवेत योगदान देण्याची संधी मिळणार आहे. सर्व प्रशिक्षणार्थ्यांनी प्रशिक्षणातील बारीकसारीक तपशीलासह माहिती व ज्ञान आत्मसात करून घ्यावे व यशस्वीपणे आपले प्रशिक्षण पूर्ण करावे, असे आवाहन जिल्हाधिका-यांनी यावेळी केले.

आधीच्या बॅचमध्ये ‘जनरल ड्यूटी असिस्टंट’ या अभ्यासक्रमाचे प्रशिक्षण पूर्ण झालेल्या उमेदवारांनी यावेळी मनोगत व्यक्त केले. डॉ. अग्रवाल यांनीही मनोगत व्यक्त केले. उपस्थित उमेदवारांना विभागाच्या विविध योजना व उपलब्ध असलेल्या ऑनलाईन सुविधा तसेच विविध शासकीय विभागांच्या योजना याबाबत वैशाली पवार यांनी मार्गदर्शन केले. श्री. शेळके यांनी प्रास्ताविक केले. डॉ. अडवाणी यांनी आभार मानले. डॉ. सिकंदर अडवाणी, डॉ. पवन अग्रवाल , डॉ. अनुराधा काकाणी, डॉ. आनंद काकाणी उपस्थित होते.

Previous articleराज्यासाठी पुढील चार दिवस धोक्याचे, वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता
Next articleशेतकरीद्रोही सरकारच्या नाकर्त्तपणाचा आ.डाँ राहुल आहेर यांनी वाचला पाढा
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here