Home माझं गाव माझं गा-हाणं शेतकरीद्रोही सरकारच्या नाकर्त्तपणाचा आ.डाँ राहुल आहेर यांनी वाचला पाढा

शेतकरीद्रोही सरकारच्या नाकर्त्तपणाचा आ.डाँ राहुल आहेर यांनी वाचला पाढा

252
0

राजेंद्र पाटील राऊत

शेतकरीद्रोही सरकारच्या नाकर्त्तपणाचा
आ.डाँ राहुल आहेर यांनी वाचला पाढा
देवळा (भिला आहेर प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क):-गेल्या दोन वर्षांपासून केवळ खोटी आश्वासने देत जनतेस झुलवत ठेवणाऱ्या ठाकरे सरकारने राज्यातील शेतकऱ्यांना प्रत्येक संकटात वाऱ्यावर सोडले असून अतिवृष्टीसारख्या भीषण संकटात भरडलेल्या शेतकऱ्यास कवडीचीही मदत न देता पाठ फिरविणारे ठाकरे सरकार शेतकरी विरोधी नव्हे, तर शेतकरीद्रोही आहे, असा घणाघाती आरोप करीत भाजपचे चांदवड-देवळा विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ राहुल आहेर यांनी ठाकरे सरकारच्या शेतकरीद्रोही कारवायांचा पाढाच माध्यमांसमोर उघड केला.
गेल्या दोन वर्षांत महाराष्ट्रावर असंख्य नैसर्गिक आपत्ती कोसळल्या. कोरोनासारख्या महामारीत बेपर्वाईमुळे अनेक निष्पाप जिवांचे बळी गेले. टाळेबंदी जाहीर केल्यानंतर हातावर पोट असणाऱ्यांना मदतीची घोषणा करून त्यांच्या तोंडाला सरकारने पाने पुसली. निसर्ग चक्रीवादळात पुरता उद्ध्वस्त झालेल्या कोकणातील शेतकऱ्यास मदत देण्याचे आश्वासन देणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी नंतर त्याकडे ढुंकूनही पाहिले नाही, उलट मदत मिळाली किंवा नाही याचाही थांगपत्ता नसल्याची कबुली देऊन संकटग्रस्त शेतकऱ्यांची थट्टा केली. दुसऱ्या टाळेबंदीत रोजगार बुडालेल्या हजारो कुटुंबांच्या मदतीसाठी केंद्राकडे बोटे दाखवत नाकर्त्या ठाकरे सरकारने ती जबाबदारीदेखी टाळली. नंतरच्या तौक्ते चक्रीवादळात केवळ धावता दौरा करून मदतीचे गाजर दाखवत परतलेल्या मुख्यमंत्र्यांनी या वादळग्रस्तांनाही वाऱ्यावर सोडले, आणि आता अतिवृष्टीच्या भीषण संकटात सापडून, उस, सोयाबीन, कापूस आदी पिकांच्या हानीमुळे सर्वस्व गमावलेल्या शेतकऱ्याविषयी साधी सहानुभूतीदेखील न दाखविता नियमांच्या कागदावर बोटे नाचवत दाखवत शेतकऱ्यांची क्रूर थट्टा सुरू आहे, असा आरोप आमदार डॉ राहुल आहेर यांनी केला. शाब्दिक फुंकर मारून संकटग्रस्तांचे आश्रू पुसण्याचा कांगावा करताना आपली कातडी बचावण्यासाठी केंद्र सरकारकडे बोटे दाखविणाऱ्या ठाकरे सरकारचा मुखवटा उघडा पडला असून सरकारचा खरा चेहरा शेतकरीद्रोहीच आहे, असे ते म्हणाले.
कोणालाही वाऱ्यावर सोडणार नाही अशी खोटी आश्वासने देऊनही आता पाच महिने उलटून गेले. वादळग्रस्त आणि पूरग्रस्त शेतकरी अजूनही वाऱ्यावरच आहे, आणि आता अतिवृष्टीग्रस्तांची भर पडली आहे. शेतकरी जेव्हा संकटात भरडला जात होता, तेव्हा हे मुख्यमंत्री राज्यातील जनतेस तिसऱ्या लाटेची भीती दाखवून घरात डांबून ठेवण्यासाठी धडपडत होते. अन्यायाविरुद्धचा जनतेचा संताप दाबण्यासाठीच हे कारस्थान होते, असा आरोपही आमदार डॉ राहूल आहेर यांनी केला. राज्यातील महिलांवर अत्याचार झाले, भ्रष्टाचाराची लक्तरे वेशीवर टांगली गेली, आणि शेतकरी देशोधडीला लागला, आणि ठाकरे सरकारचा शेतकरीद्रोही नाकर्तेपणा शिगेला पोहोचला, असे ते म्हणाले. कोरोनाची ढाल पुढे करून स्वतःचा बचाव करणारे व जनतेला आणि शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणारे ठाकरे सरकार महाराष्ट्रद्रोही आणि शेतकरीद्रोही आहे, याचा पुनरुच्चार करून, अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांवरील अन्याय दूर होईपर्यंत भाजपचा संघर्ष सुरू राहील असा इशारा आमदार डॉ राहुल आहेर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिला आहे.

Previous articleमुख्यमंत्री महाआरोग्य कौशल्य विकास प्रशिक्षण जिल्हाधिकारी पवनीत कौर यांच्या उपस्थितीत रेडिएंट रुग्णालयात दोन अभ्यासक्रमांचा शुभारंभ
Next articleबोर नदीपात्रात बुडून महिलेचा
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here