Home पश्चिम महाराष्ट्र बोर नदीपात्रात बुडून महिलेचा

बोर नदीपात्रात बुडून महिलेचा

164

राजेंद्र पाटील राऊत

बोर नदीपात्रात बुडून महिलेचा मृत्यू
सांगली,( शरद चव्हाण ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)
सोनलगी (ता. जत, जि. सांगली) येथे बोर नदीच्या काठावर कपडे धुण्यास गेलेली अपंग महिला वाहून गेली. या दुर्दैवी घटनेत त्या महिलेचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. सोनाली तुकाराम कांबळे (वय २६) असे दुर्दैवी महिलेचे नाव आहे. मंगळवारी सकाळी बोर नदीच्या काठावर मृतदेह तरंगताना बाहेर काढला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, सध्या दिवाळी व दसरा सणाच्या निमित्ताने घरातील स्वच्छता सुरू आहे. पूर्व भागातील बोर नदीला पाणी असल्याने महिला कपडे धुण्यासाठी गर्दी करत आहेत, दरम्यान सोनाली कांबळे या सोमवारी दुपारी तीन वाजता कपडे धुण्यास गेल्या असता पाय घसरून पाण्यात पडल्या. ही घटना समजातच तत्काळ बचाव कार्य सुरू करण्यात आले.

सांगलीहून ( Sangli ) जीव रक्षक बचाव पथक बोलावण्यात आले होते. मात्र ते रात्री उशिरापर्यंत पोहोचले नाही. तसेच पाण्याचा वेग जास्त असल्याने शोध घेण्यास गावक-यांना अडचणी निर्माण झाल्या होत्या. अखेर मंगळवारी सकाळी नदीपात्रात मृतदेह पाण्यावर तरंगताना दिसला. त्यानंतर सोनाली कांबळे यांचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. या मृतदेहाचे ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले आहे.

Previous articleशेतकरीद्रोही सरकारच्या नाकर्त्तपणाचा आ.डाँ राहुल आहेर यांनी वाचला पाढा
Next articleकोल्‍हापूर : स्पर्धा परीक्षेत यश मिळत नसल्याने तरुणाची आत्महत्या
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.