देवळा तालुक्यात गायी बैलांच्या चोऱ्या वाढल्या,शेतकरी त्रस्त!
(भिला आहेर प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क)
देवळा:- देवळा तालुक्यात मुक़्या जनावरांची चोरी
देवळा तालुक्यात सध्या शेतकऱ्यांच्या गाई व बैलांच्या चोरीचे सत्र वाढले असून त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे .
याबाबत सविस्तर वृत्त असे की देवळा तालुक्यातील भउर परिसरात दोन दिवसांपूर्वीच शेतातून बैलजोडी चोरी गेल्याची घटना ताजी असतानाच काल दि.१७ रोजी मेशी येथील तरुण शेतकरी सुधाकर बाबूराव बोरसे यांच्या घरासमोरून रात्रि दोन वाजेच्या सुमारास दोन लाख रुपये किंमतीच्या दोन गायी चोरी झाल्या ही बाब बोरसे यांच्या लक्षात येताच त्यांनी तत्काळ देवळा पोलीस ठाण्यास दूरध्वनी वरुन माहिती देण्याचा प्रयत्न केला असता दुरध्वनी बन्दच असल्याने शेवटी बोरसे यांनी १०१ नंबरवर ही माहिती कळविली असता रात्रि उशीरा घटनास्थळी पोलीस पोहोचले .
दरम्यान गेल्या महिनाभरात मेशी आणि परिसरात सुमारे १५ ते २० गायी चोरीला गेल्या असल्याचे परिसरातील शेतकऱ्यांनी यावेळी सांगितले.एक तर आधीच तालुक्यात अतिपावसाने शेतिपिकांचे आतोनात नुकसान झाले असून जगावे कसे ह्या विवंचनेत बळीराजा पडला असून अशातच जनावरांच्या चोरीमुळे शेतकरी जास्तच आर्थिक संकटात सापडला आहे.असे असतांना देवळा पोलिसांनी रात्रीची गस्त वाढविणे गरजेचे असताना उलट देवळा पोलीस ठाण्याचा दूरध्वनिच गेल्या तीन दिवसांपासून बंद येत असल्याची एक मोठी शोकांतिकाच आहे.पोलीस ठाण्याचा दूरध्वनि नेहमीच चालू असणे गरजेचे असताना गेल्या तीन दिवसांपासून सदर दूरध्वनी बन्दच असल्याने तालुक्यातील जनतेची सुरक्षा आता ज्याने त्यानेच काळजी घेण्याची वेळ आली आहे असे म्हटले तर वावगे ठरू नये.
