• Home
  • गंजगाव(ता. बिलोली) सज्जाच्या तलाठ्यासह त्याच्या खाजगी सहकर्यास २५ हजाराची लाच घेताना अटक

गंजगाव(ता. बिलोली) सज्जाच्या तलाठ्यासह त्याच्या खाजगी सहकर्यास २५ हजाराची लाच घेताना अटक

राजेंद्र पाटील राऊत

Anti-Corruption-Bureau-1591827827.jpg

गंजगाव(ता. बिलोली) सज्जाच्या तलाठ्यासह त्याच्या खाजगी सहकर्यास २५ हजाराची लाच घेताना अटक

नांदेड, दि.१० – राजेश एन भांगे युवा मराठा न्युज नेटवर्क

कोटग्याळ (ता. बिलोली, जि. नांदेड) येथील शेतजमिनीचा फेरफार करून सात बारा देण्यासाठी २५ हजाराची लाच घेताना गंजगाव (ता. बिलोली) सज्जाचे तलाठी पवन सायलू ठकरोड (वय ३६) यांच्यासह त्याचा खासगी सहकारी सुजीत रामेश्वर ठकरोड (वय ३०, दोघे रा. गांधी चौक, बिलोली) या दोघांना नांदेडच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शुक्रवारी (ता. आठ) अटक केली.

कोटग्याळ येथील तक्रारदारास स्वतः खरेदी केलेले व वडिलोपार्जित शेतजमिनीचा फेरफार करून सातबारा हवा होता. त्यासाठी त्यांनी गंजगाव सज्जाचे तलाठी पवन ठकरोड यांची भेट दिली. मात्र, त्यांनी सात बारा देण्यासाठी ४५ हजार रुपयांची लाच मागितली होती. दरम्यान, तक्रारदाराने नांदेड येथील लाचलचुपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयाकडे ता. ३१ डिसेंबर रोजी तक्रार दिली होती.

या पडताळणीत तलाठी पवन ठकरोड यांनी तडजोडीअंती ३० हजारांची मागणी करून २५ हजार रुपये स्विकारण्याचे मान्य केले. त्यानुसार शुक्रवारी (ता. आठ) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचला. यावेळी लाचेची २५ हजाराची रक्कम तलाठी ठकरोड यांनी मागितली आणि खासगी सहकारी सुजीत ठकरोड यांना देण्यास सांगितली. त्यानुसार सावळी रोडवरील त्यांच्या तलाठी सज्जा खासगी कार्यालयात रक्कम स्विकारताना पोलिसांनी दोघांनाही अटक केली.

सदरील कार्यवाही लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिस अधीक्षक कल्पना बारवकर, अतिरिक्त पोलिस अधीक्षक अर्चना पाटील, पोलिस उपअधीक्षक विजय डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक राहुले पखाले, पोलिस नायक बालाजी तेलंगे, सचिन गायकवाड, गणेश तालकोकुलवार, मारोती सोनटक्के यांनी पार पाडली. याबाबत बिलोली पोलिस ठाण्यात या दोघांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शासकीय अधिकारी, कर्मचारी हे शासकीय काम करण्यासाठी लाचेची मागणी करत असल्यास तसेच त्यांचे लाचेच्या मागणीचे मोबाईल फोनवर लोकसेवक यांचे एसएमएस किंवा व्हिडिओ, आॅडिओ क्लिप असल्यास भ्रष्टाचार संबंधाने काही माहिती असल्यास किंवा माहिती अधिकारात शासकीय अधिकारी, कर्मचारी यांनी शासकीय निधीचा भ्रष्टाचार केला असेल तर १०६४ या टोल फ्री क्रमांकावर किंवा कार्यालयाच्या ०२४६२ – २५३५१२ या क्रमांकावर अथवा पोलिस उपअधीक्षक विजय डोंगरे यांच्या ८९७५७६९९१८ या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन नांदेडच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागातर्फे करण्यात आले आहे.

anews Banner

Leave A Comment