Home जळगाव चाळीसगावात घरातून सव्वा चार लाखांचा ऐवज लंपास

चाळीसगावात घरातून सव्वा चार लाखांचा ऐवज लंपास

73
0

आशाताई बच्छाव

IMG_20231221_045556.jpg

चाळीसगावात घरातून सव्वा चार लाखांचा ऐवज लंपास

चाळीसगाव प्रतिनिधी विजय पाटील- रात्री जेवण करून कुटुंब घराच्या वरच्या मजल्यावर झोपण्यास गेल्याचा फायदा घेऊन चोरट्यांनी दूध व्यापाऱ्याच्या खालच्या मजल्याचा दरवाजाचा कडी कोंडा तोडून आत प्रवेश करून कपाटातून रोख रक्कम, सोन्याचे दागिणे व मोबाईल असा सुमारे 4 लाख 20 हजार रूपये किंमतीचा ऐवज चेारून नेल्याची घटना दि 19 व 20 च्या रात्री शहरातील हिरापूर रोड भागात घडली आहे.
विजय प्रल्हाद स्वार (48) रा. नवीन नाका पुढे, हनुमान मंदिर, हिरापूर रेाड चाळीसगाव यांचा दूध डेअरीचा व्यवसाय आहे.मंगळवार 19 रोजी रात्री 10 वाजता स्वार कुटुंबिय जेवण करून घराच्या मागील दरवाजाला आतुन कडी लावून व मेन गेटला कुलूप लावून वरच्या मजल्यावर झोपण्यास गेले.
आज बुधवारी पहाटे 5 वाजेच्या सुमारास स्वार यांच्या पत्नी उठल्यानंतर घराच्या मेन दरवाजाचे कुलून उघडण्यास गेल्या असता त्यांना घराचे कडी कोंडा तुटलेला दिसला.
स्वार यांनी घरात जावून पाहीले असता मागील बेडरूममधील पत्री कपाटातील साहीत्य अस्तव्यस्त दिसले.कपाटाच्या तिजोरीत लोखंडी टपरी विक्रीचे पैसे व दुध व्यसायाचे पैसे अशी 4 लाखांची रोकड, 2 हजार रूपये किंमतीची सोन्याची कानातील वेल आणि खिडकीत ठेवलेला 18 हजार रूपये किंमतीचा ऐवज मिळून आले नाही.
असा सुमारे 4 लाख 20 हजार रूपये किंमतीचा ऐवज चेारट्यांनी दि.19 रोजी रात्री 10 ते दि.20 रेाजी पहाटे 5वाजेच्या दरम्यान घरात प्रवेश करून चेारून नेला. याप्रकरणी विजय स्वार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here