Home उतर महाराष्ट्र येत्या लोकसभा व विधानसभा निवडणूकीत बौद्ध समाजास उमेदवारी न दिल्यास निवडणूकीवर बहिष्कार...

येत्या लोकसभा व विधानसभा निवडणूकीत बौद्ध समाजास उमेदवारी न दिल्यास निवडणूकीवर बहिष्कार टाकणार

51
0

आशाताई बच्छाव

IMG_20240305_062826.jpg

येत्या लोकसभा व विधानसभा
निवडणूकीत बौद्ध समाजास
उमेदवारी न दिल्यास निवडणूकीवर बहिष्कार टाकणार .
– – – – – – – – – – – – – – – – – –
श्रीरामपूर ( प्रतिनिधी दिपक कदम)
येत्या लोकसभा व विधानसभा
निवडणूकीमध्ये बौद्ध समाजास
उमदेवारी न दिल्यास हा समाज
निवडणूकीवर बहिष्कार टाकणार असा ठराव श्रीरामपूर
येथे व्हि.आय.पी. गेस्ट हाऊस
मध्ये आयोजित बैठकीत घेण्यात आला. येत्या लोकसभा
व विधानसभा निवडणूकी संदर्भात विचार विनिमय करण्यासाठी प्रमुख कार्यकर्त्यांची महत्वपूर्ण बैठक
नुकतीच संपन्न झाली.
बैठकीच्या अध्यक्षस्थानी रिजनल ख्रिश्चन सोसायटीचे
कार्याध्यक्ष डॉ. प्रवीणराजे साळवे हे होते.
सन २००९ पासून शिर्डी
लोकसभा व श्रीरामपूर विधानसभा मतदार संघ अनुसूचित जाती साठी राखीव
आहे. परंतु गेल्या तीन पंचवार्षिक निवडणूकांमध्ये
प्रस्थापित पक्ष व नेते बौद्ध
समाजास उमेदवारी न देता
सातत्याने एका विशिष्ट समाजाच्या उमेदवारास उमेदवारी देवून बौद्ध समाजावर सातत्याने अन्याय
करीत आहे. या मागील अनेक
निवडणूकांमध्ये बौध्द मागास
वर्गीय व मुस्लीम समाज प्रामाणिकपणे
प्रस्थापित पक्ष व त्यांच्या नेत्यांना मतदान करून
निवडून आणतात परंतु गेली
अनेक वर्ष फुले शाहु आंबेडकर
चळवळीमध्ये तसेच विविध सामाजिक आंदोलनात व समाजकार्यात योगदान देणाऱ्या कार्यकर्त्यांना मात्र
सातत्याने उमेदवारीपासून
डावलण्यात येत आहे.
तसे पाहता या राखीव मतदार
संघात बौद्ध मागासवर्गीय
समाजाची लोकसंख्या मोठ्या
प्रमाणात असताना सुद्धा
सातत्याने बौद्ध समाजास
लोकसभा व विधानसभा
उमेदवारी दिली जात नाही
त्यामुळे ह्या समाजात
संतापाची लाट पसरली आहे.
जर बौद्ध समाजास लोकसभा
विधानसभा निवडणूकीत प्रतिनिधित्व दिल्यास सर्व समाज आपले
सर्व गटतट विसरून समाजाच्या उमेदवाराच्या
पाठीशी तन मन धनाने खंबीरपणे उभा राहिल
असा निर्धार याप्रसंगी व्यक्त
करणात आला. याप्रसंगी
अनेक कार्यकर्त्यांनी आपले
अभ्यासू विचार मांडले.
या नंतर निवडणूकीची पुढील
रणनिती ठरविण्यासाठी लवकरच मोठ्या प्रमाणात
सामाजिक ऐक्य परिषदेचे
आयोजन केले जाणार असल्याचे या मेळाव्याचे निमंत्रक सुभाषदादा त्रिभुवन
व संदिप मगर यांनी सांगितले.
या बैठकीस राजाभाऊ कापसे ,
पी.एस.निकम, भिमाभाऊ
बागुल , अशोकराव दिवे ,
मिलिंदकुमार साळवे, कार्लस
साठे, रमेश मकासरे , रविंद्र
गायकवाड , रितेश एडके ,
सचिन ब्राम्हणे , दिपक कदम
डॉ.दिलीप शेजवळ , सुरेश
कांबळे, ॲड प्रमोद सगळगिळे
ॲड .एन.एम.येवले , राहुल पठारे, सचिन पंडित , आंबादास निकाळजे , फ्रान्सिस
शेळके , संजय शिरसाठ, प्रदिप
गायकवाड , सुनिल कसाब ,
पॉल बनकर, प्रशांत शिंदे ,
अशोक बारसे , मंगेश गायकवाड, गौतम डोंगरे , अर्जुन शेजवळ , अमोल काळे
योगेश बनसोडे , कार्तिक बारसे
रावसाहेब घोडे , सागर पारखे
विनायक नाऊस्कर आदी सह
विविध पक्ष , संघटनाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने
उपस्थित होते .

Previous articleमायलेकीवर चाकू हल्ला करणाऱ्या विश्वासची कारागृहात रवानगी..
Next articleराहुरी तालुक्यातील इलेक्ट्रिक मोटार पंप व मोटरसायकल चोरी करणारे १० आरोपी राहुरी पोलीस कडून अटक
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here