Home Breaking News 🚆🚆**सरकार ची मोठी घोषणा -रेल्वे होणार आता खासगी**🚆🚆✍️(▪️राहुल मोरे निवासी संपादक युवा...

🚆🚆**सरकार ची मोठी घोषणा -रेल्वे होणार आता खासगी**🚆🚆✍️(▪️राहुल मोरे निवासी संपादक युवा मराठा न्यूज▪️)

380
0

🚆🚆**सरकार ची मोठी घोषणा -रेल्वे होणार आता खासगी**🚆🚆✍️(▪️राहुल मोरे निवासी संपादक युवा मराठा न्यूज▪️)
:भारतीय  रेल्वेने एक महत्त्वपूर्ण घोषणा केली. 109 मार्गांवर खासगी रेल्वे सुरू करण्याची तयारी सुरू केली आहे. या ठराविक मार्गांवर दोन्ही बाजूंनी धावणाऱ्या आधुनिक 151 रेल्वेगाड्या खासगी तत्त्वावर चालवण्यात येणार आहेत.
रेल्वे मंत्रालयाने यासंबंधी प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटलं आहे की यातून भारतीय रेल्वेला 30 हजार कोटींची गुंतवणूक अपेक्षित आहे. या योजनेद्वारे प्रथमच प्रवासी रेल्वेगाड्यांसाठी खासगी क्षेत्राला आमंत्रित करण्यात येत आहे.
भारतीय रेल्वेने याच तत्वावर RCTC च्या माध्यमातून लखनौ-दिल्ली तेजस एक्स्प्रेस ही आलिशान प्रवासी गाडी सुरू केली आहे.
यातल्या बहुतेक गाड्यांची निर्मिती भारतात झालेली आहे. प्रत्येक गाडीला किमान 16 डबे असतील. ताशी 160 किमी वेगाने धावणाऱ्या या गाड्या असतील.
या सर्व खासगी रेल्वेगाड्या भारतीय रेल्वेच्या म्हणजे सरकारी ड्रायव्हर आणि गार्ड्सकडूनच चालवण्यात येतील. या गाड्यांच्या निर्मितीपासून, देखभाल आदी सेवा पूर्णपणे भारतीय बनावटीच्या असतील. या गाड्यांच्या निर्मितीचा खर्च, दररोजचा खर्च आणि इतर खर्च खासगी संस्था करेल.
रेल्वेने या पत्रकार म्हटलं आहे की, रोजगार निर्मिती आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि त्यावर होणाऱ्या देखभाल खर्चात कपात करण्याच्या उद्देशाने खासगी क्षेत्राला रेल्वेने आमंत्रित केलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here