• Home
  • *येरवडा तुरुंगातुन कोरोनो पाँझिटीव्ह दोन कैद्यांचे पलायन*

*येरवडा तुरुंगातुन कोरोनो पाँझिटीव्ह दोन कैद्यांचे पलायन*

*येरवडा तुरुंगातुन कोरोनो पाँझिटीव्ह दोन कैद्यांचे पलायन*

*कोल्हापूर (मोहन शिंदे ब्युरोचिफ युवा मराठा न्युज)*

येरवडा येथील तात्पुरत्या कारागृहातून कोरोना पॉझिटिव्ह आरोपी पळून गेल्याचा प्रकार मध्यरात्री सव्वा एक वाजण्याच्या सुमारास घडला. दोघेही गंभीर गुन्ह्यातील संशयित आरोपी आहेत.
अनिल विठ्ठल वेताळ ( वय २१) आणि विशाल रामधन खरात अशी पळून गेलेल्या दोघांची नावे आहेत. वेताळ याच्यावर शिक्रापूर पोलिस ठाण्यात मारहाण करून जबरी चोरी केल्याचा गुन्हा दाखल आहे. तर खरात याच्यावर चिखली पोलिस ठाण्यात खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे.
कारागृह प्रशासनाच्यावतीने कोरोना पॉझिटिव्हच्या आणि पक्क्या कैद्यांसाठी तात्पुरत्या कारागृहाची निर्मिती करण्यात आली आहे.
न्यायालयीन कोठडीत असलेल्या तात्पुरत्या कारागृहाची बिल्डिंग क्र. १०४, पहिला मजला येथील खोली क्रमांक एकमध्ये कोरोनावर उपचार घेत असताना दोघे पळून गेले आहेत. या पूर्वीही कारागृहातून आरोपी पळून गेल्याच्या घटना घडल्या आहेत.
कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या दोघा आरोपींच्या पालायनायनाने प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे. दोघांवर येरवडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांच्या शोधासाठी पथके रवाना करण्यात आली आहेत. गुन्ह्याचा तपास येरवडा पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक बलभीम ननवरे करत आहे.

anews Banner

Leave A Comment