• Home
  • प्रहार तालुका उपाध्यक्ष पदी बालाजी राठोड यांची निवड…

प्रहार तालुका उपाध्यक्ष पदी बालाजी राठोड यांची निवड…

Anshuraj patil

IMG-20210225-WA0068.jpg

प्रहार तालुका उपाध्यक्ष पदी बालाजी राठोड यांची निवड…
मुखेड तालुका प्रतिनिधी मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)

प्रहार जनशक्ती पक्षाच्या मुखेड तालुका उपाध्यक्ष पदी मुखेड तालुक्यातील युवा सामाजिक कार्यकर्ते बालाजी राठोड यांची निवड करण्यात आली आहे.

शेतकरी,कष्टकरी,शेतमजूर,कामगार अनाथ,अपंग,वंचित शोषितांच्या न्याय हक्क मिळवुन
देण्यासाठी मा.ना.बच्चु भाऊ कडू
साहेबांचे विचार जनसामान्यांपर्यंत पोहोचवत पक्षाची ध्येय – धोरणे सर्वसामान्य जनतेपर्यंत नेण्यासाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष मा.विठ्ठल देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली युवा नेतृत्व,प्रहार जनशक्ती पक्षाचे मुखेड तालुका अध्यक्ष मा.शंकर अण्णा वडेवार यांच्या हस्ते,जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते तथा ग्रा.प सदस्य शेषेराव पा.बोडके धनजकर यांच्या प्रमुख उपस्थितीत हि निवड करण्यात आली आहे.अशी माहिती प्रसारमाध्यमांशी बोलतांंना प्रहारचे सोशल मिडिया प्रमुख अनिल घायाळे यांनी दिली आहे.यावेळी प्रहारचे सचिव गोपाळ पाटील हिवराळे जाहुरकर,प्रहार मुखेड शहराध्यक्ष
साईनाथ बोईनवाड,पत्रकार रणजित जामखेडकर
मोहन घायाळे,शिवराज वडजे,सुनील चव्हाण प्रहार युवा ता.उपाध्यक्ष,विश्वजीत इंगोले,नामदेव वडजे, संजय होडगीरे,पोशेट्टी सोमशेट्टे,अस्लम सय्यद,खंडू येवतीकर यांच्यासह आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

anews Banner

Leave A Comment